Andheri By poll Live : आदित्य ठाकरे-आशिष शेलार रस्त्यावर, अंधेरीत जोरदार प्रदर्शन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असून, ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच थेट लढत होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी रॅली काढून शक्तीप्रदर्शनही महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाणार आहे. दुसरीकडे मुरजी पटेल १३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. तेही आज अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर होत असलेल्या पहिल्या निवडणुकीत जनमत कुणाला कौल देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’च्या उमेदवार ऋतुजा लटके, तर भाजपकडून मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल होण्यापूर्वी महाविकास आघाडी आणि भाजप प्रणीत महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय.

ऋतुजा लटकेंचा अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदित्य ठाकरे, अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महाविकास आघाडीतले नेते सहभागी झालेत. तर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या रॅलीत आशिष शेलार, शिंदे गटाचे दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह इतर नेते सहभागी झालेत.

हे वाचलं का?

अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंना करणार पराभूत? मुरजी पटेल अर्ज भरण्यापूर्वी काय म्हणाले?

‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा महापालिकेकडून स्वीकारण्यात आलाय. उच्च न्यायालयाने यासंदर्भात महापालिका प्रशासनाला आदेश दिले होते. ११ वाजेपर्यंत राजीनामा मंजूरीचं पत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. आज राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं पत्र ऋतुजा लटकेंना देण्यात आलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न केल्यानं महापालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं. लटकेंनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिल्यानंतर काही वेळात महापालिका प्रशासनानं ऋतुजा लटकेंना फोन करण्यात आला होता. राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं फोनवरून सांगण्यात आल्याची माहिती स्वतः लटकेंनीच दिलीये. राजीनामा मंजूर झाल्यानंतर आज लटके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटके अडथळ्यांची शर्यत पार करून निवडणुकीच्या मैदानात

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटके यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, ऋतुजा लटकेंना राजीनामा प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका प्रशासनानं मंजूर केला नाही. महापालिका प्रशासनावर शिंदे गटाकडून दबाव टाकण्यात आल्याचंही बोललं गेलं. राजीनामा मंजूर होत नसल्यानं ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिल्यानं लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. ऋतुजा लटके निवडणूक रिंगणात आल्यानं शिंदे गटासाठी अडचणीचं ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळातून सांगितलं जात आहे.

Andheri By Poll: कोर्टाचा निर्णय आला आणि टेन्शनमध्ये असलेल्या ऋतुजा लटकेंच्या चेहऱ्यावर उमटलं हसू..

ऋतुजा लटकेंचा अर्ज भरताना हे नेते असणार उपस्थित

ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असणार आहेत. यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री अनिल परब, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’चे सचिव अनिल देसाई यांच्यासह इतरही नेते उपस्थित राहणार आहेत.

ऋतुजा लटके महाविकास आघाडीच्या उमेदवार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिलीये. त्यांना महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही पाठिंबा दिलाय. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड, सीपीआयनेही लटकेंना पाठिंबा जाहीर केलाय.

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नावासह धनुष्यबाण निवडणूक चिन्हही गोठवण्यात आलंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्षाचा उमेदवार मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला ढाल आणि दोन तलवारी चिन्ह मिळालं आहे. मात्र, शिंदे गट भाजप उमेदवारालाच पाठिंबा देणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

शिंदेंना दुसरा झटका! न्यायालयाने महापालिकेचे टोचले कान, ऋतुजा लटकेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ही पहिलीच निवडणूक होत असून, या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध युती (भाजप, बाळासाहेबांची शिवसेना) आमने-सामने आले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT