अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंना करणार पराभूत? मुरजी पटेल अर्ज भरण्यापूर्वी काय म्हणाले?
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरूवात झालीये. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे होत असलेल्या या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पु एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये राजकीय सामना बघायला मिळणार आहे. निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार आज अर्ज दाखल करत असून, मुरजी पटेलांनी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल […]
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरूवात झालीये. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे होत असलेल्या या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पु एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये राजकीय सामना बघायला मिळणार आहे. निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार आज अर्ज दाखल करत असून, मुरजी पटेलांनी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय.
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके आज अर्ज दाखल करणार असून, त्यापूर्वी दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
मुरजी पटेल म्हणाले, “अंधेरी पूर्वतील जवळपास ७० टक्के जनता तुम्हाला रस्त्यावर दिसेल. २५ हजार लोक रस्त्यावर असतील. ही निवडणूक मुरजी पटेलची नाही, तर अंधेरी पूर्वच्या लोकांची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज भरायला निघालोय.”
हे वाचलं का?
“मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाचा आदेश मान्य करतो. रात्री पक्षाचा आदेश आला आणि आज अर्ज भरतोय. ही निवडणूक भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय यांच्या महायुतीचा उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवतोय. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार”, असं मुरजी पटेल यांनी सांगितलं.
Andheri By poll Live : कोर्टानं फटकरताच ऋतुजा लटकेंना महापालिकेतून फोन
ADVERTISEMENT
ऋतुजा लटके यांच्या नोकरीच्या राजीनाम्यावरून बऱ्याच घडामोडी घडल्या. मागे भाजप असल्याचाही आरोप झाला. त्यावर बोलताना मुरजी पटेल म्हणाले, “भाजप असं कोणतंही काम करत नाही, ज्यामुळे डाग लागेल. ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याशी भाजपचा काहीही संबंध नाहीये. याबद्दल मुंबई महापालिकेचे अधिकारी जास्त माहिती देऊ शकतील. ऋतुजा लटके यांची उमेदवारी मला आव्हान वाटत नाही. भाजप वर्षानुवर्ष या मतदारसंघात काम करतेय. प्रत्येक बुथवर आमचे २५ कार्यकर्ते आहे. त्यामुळे आव्हान वाटत नाही.”
ADVERTISEMENT
Andheri By Poll : ठाकरेंची ताकद वाढली; CPI पाठोपाठ संभाजी ब्रिगेडची मिळाली सोबत
ऋतुजा लटकेंना ३५ हजारांनी पराभूत करणार, मुरजी पटेल काय म्हणाले?
“अंधेरी पूर्वमध्ये सर्वात मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मुक्त अंधेरी आम्ही करणार आहोत. अंधेरी पूर्वत एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे विकासाची कामं आम्ही करू. अंधेरीतला जनता विकासाच्या बाजूने आहे. आता नेते नसले तरी मी अर्ज भरताना महाराष्ट्रातले नेते तुम्हाला दिसतील. आम्ही ही निवडणूक ३५ ते ३५,५०० हजारांच्या मताधिक्याने जिंकू”, असा दावा मुरजी पटेल यांनी केलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT