प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराचे मानकरी कोण-कोण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: केंद्र सरकारतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्करांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर दिवंगत सीडीएस बिपिन रावत आणि कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. आता त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सरकारद्वारे त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारने सन्मानीत करण्यात येणार आहे. त्यांच्याशिवाय उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांना देखील मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे. त्यांचं देखील मागील वर्षी निधन झालं होतं.

पाहा महाराष्ट्रातून कोणाकोणाला मिळाले पद्म पुरस्कार

हे वाचलं का?

यंदा महाराष्ट्रातील आठ दिग्गजांची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये एक पद्मविभूषण दोन पद्मभूषण आणि पाच पद्मश्री आहेत. पाहा महाराष्ट्रातील हे आठ दिग्गज नेमके आहेत तरी कोण.

  1. प्रभा अत्रे – पद्मविभूषण

ADVERTISEMENT

  • नटराजन चंद्रशेखरन – पद्मभूषण

  • ADVERTISEMENT

  • सायरस पूनावाला – पद्मभूषण

  • डॉ. हिंमतराव बावस्कर – पद्म

  • सुलोचना चव्हाण – पद्म

  • डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे – पद्म

  • सोनू निगम – पद्म

  • अनिल कुमार राजवंशी – पद्म

  • याशिवाय केंद्र सरकारने मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, सीरम इन्सिट्यूटचे एमडी सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

    Republic Day 2022 History: …म्हणून 26 जानेवारीलाच साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन!

    तर याशिवाय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, प्रमोद भगत आणि वंदना कटारिया यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT