Narayan Rane: राणेंना आणखी एक धक्का, नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस
नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. कारण नुकतेच जामिनावर बाहेर आलेल्या राणेंनी नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. काल (24 ऑगस्ट) रत्नागिरीमध्ये राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामिन मिळताच राणे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. असं असताना राणेंना […]
ADVERTISEMENT
नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. कारण नुकतेच जामिनावर बाहेर आलेल्या राणेंनी नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. काल (24 ऑगस्ट) रत्नागिरीमध्ये राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामिन मिळताच राणे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. असं असताना राणेंना आता पुन्हा नवी नोटीस बजावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले होते.
ज्यानंतर त्यांच्यावर रत्नागिरीतच अटकेची कारवाई करण्यात आली होती. पण रात्री उशिरा राणेंना जामीन मंजूर झाला. असं असताना नाशिक पोलिसांनी राणेंना आता पुन्हा नोटीस बजावली असून 2 सप्टेंबरपर्यंत नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
हे वाचलं का?
मात्र, असं असलं तरी नारायण राणे हे नाशिक पोलिसांनी बजावलेली नोटीस स्वीकारणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Narayan Rane म्हणजे भोकं पडलेला फुगा, ‘सामना’तून शिवसेनेचा ‘प्रहार’
ADVERTISEMENT
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?
ADVERTISEMENT
नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. नारायण राणे असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना?’
‘मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.’ अशी वादग्रस्त टीका नारायण राणे यांनी केली होती.
राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा अक्षरश: स्फोट झाला होता. राणेंच्या वक्तव्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या.
दुसरीकडे नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर नारायण राणेंना अटक करण्यात आली होती.
त्याआधी मुंबईसह पुणे, नाशिक आणि राज्यातील अनेक ठिकाणी राणेंविरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आलं होतं. यावेळी काही ठिकाणी राणेंची पोस्टर जाळण्यात आली होती. तर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT