कारप्रकरणात ट्विस्ट, तिहारमध्ये छापा; दहशतवाद्याकडून मोबाइल जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी संशयित कार सापडली होती. त्याप्रकरणाचे थेट तिहार जेलशी कनेक्शन जुळलं असल्याची माहिती कालच समोर आली होती. मात्र आता यापेक्षाही अधिक मोठी आणि या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट निर्माण करणारी बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

ती म्हणजे तिहार जेलमधील एका खतरनाक दहशतवाद्याकडे एक मोबाइल फोन सापडला असून याच मोबाइल फोनमधून टेलिग्राम चॅनल अॅक्टिव्हेट झाल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती ‘मुंबई तक’च्या हाती लागली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सींनी कालच इंडियन मुजाहिदीनच्या खतरनाक दहशतवाद्याकडून मोबाइल जप्त केला आहे. तिहार जेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरक्षा एजन्सींकडून छापेमारी सुरु होती. त्याचवेळी हा मोबाइल जप्त करण्यात आला.

हे वाचलं का?

यावेळी सुरक्षा दलांनी जेल नंबर 8 मध्ये छापा टाकला आहे. यावेळी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तहसीन अख्तरच्या बॅरकमध्ये मोबाइल आढळून आला.

याच मोबाइलमधून टेलिग्राम चॅनल अॅक्टिव्हेट केलं गेलं असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. तहसीन अख्तर हा हैदराबाद बॉम्बस्फोट, बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणात सामील होता.

ADVERTISEMENT

जेव्हा तहसीनच्या बॅरकमधून सुरक्षा यंत्रणांना मोबाइल आढळून आला त्यासोबत एक नवी माहिती देखील समोर आली. ती म्हणजे या मोबाइलमध्ये टोर ब्राऊचरच्या मदतीने एक व्हर्च्युअल नंबर क्रिएट करण्यात आला होता आणि टेलीग्राम अकाउंट तयार करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

त्यानंतर अंबानींच्या नावे धमकीचं पोस्टर देखील तयार करण्यात आलं होतं. आता याच सगळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तहसीन अख्तर याला रिमांडमध्ये घेऊन चौकशी करत आहे.

कारबाबत नवा ट्विस्ट; ‘ते’ टेलिग्राम चॅनल तिहार जेलमध्ये बनलं!

याशिवाय एक दुसरा मोबाइल नंबर देखील स्पेशल सेलच्या रडारवर आहे. हा नंबर सप्टेंबरमध्ये अॅक्टिव्हेट झाला होता आणि नंतर तो बंद करण्यात आला.

सूत्रांच्या मते, दोन मोबाइल नंबर हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे खरेदी करण्यात आले होते. ते खासकरुन तिहारमधील लोकांसाठीच खरेदी केले गेले होते.

दरम्यान, अंबानीच्या घराबाहेर जी कार सापडलेली होती त्याविषयी आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूविषयी महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे.

अंबानींच्या घरासमोरील कार आणि धमकीचं बॅनर… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे:

25 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी याच्या मुंबईतील अँटेलिया घराबाहेर संशयित स्कॉर्पिओ कार सापडली होती. ज्यामध्ये काही जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे या सर्वत्र खळबळ उडाली होती.

दरम्यान, 28 फेब्रुवारी 2021 रोजी अंबानींच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणी अशी माहिती समोर आली की, संशयित गाडीबाबत जैश-उल-हिंद या नावाच्या एका संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ही जबाबदारी स्वीकारल्याचं त्यावेळी सांगितलं गेलं.

अंबानींच्या घराबाहेरील गाडीप्रकरणी ‘या’ संघटनेने घेतली जबाबदारी

पहिल्या दिवशी जे बॅनर समोर आलं होतं. त्यात असं म्हटल होतं की, ‘थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा… तुम्ही तेव्हा देखील काहीही करु शकला नव्हता जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखालून दिल्लीत तुम्हाला ‘हिट’ केलं होतं.

तुम्ही मोसादसोबत हातमिळवणी केली पण काहीही झालं नाही. तुम्ही लोकं वाईट पद्धतीने अपयशी ठरला आहात आणि पुढे देखील तुम्हाला यश मिळणार नाही.’

याच मेसेजमध्ये पुढे असं लिहलं आहे की, (अम्बानिज साठी) ‘तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. फक्त पैसे ट्रान्सफर करा, जे तुम्हाला आधी सांगितलं होतं.’ यामुळे या संपूर्ण प्रकरणात दहशतवादी संघटनेचाच हात आहे असं चित्र निर्माण झालं होतं.

‘आमच्याकडून अंबानींना धोका नाही’, पोलिसांकडून जैश-हिंदचं बॅनर जारी

‘आमच्याकडून अंबानींना धोका नाही’, पोलिसांकडून जैश-हिंदचं बॅनर जारी

दरम्यान, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 मार्च 2021 रोजी दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने आपण मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवलं नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी मुंबई पोलिसांनी अधिकृतरित्या जैश-उल-हिंद संघटनेचा एक बॅनर शेअर केला होता.

त्या बॅनरमध्ये असं म्हटलं होतं की, त्यांनी अंबानींना कोणतीही धमकी दिलेली नाही. त्यामुळे मीडियामध्ये आमच्या नावे जे बॅनर फिरतं आहे ते खोटं आहे.

पाहा त्या बॅनरमध्ये नेमकं काय म्हटलं होतं

‘आज सकाळी आम्ही पाहिलं की, भारतीय मीडियामध्ये एक वृत्त सुरु होतं की, आम्ही ‘जैश-उल-हिंद’ने भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील जी कार पार्क केली आहे त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हाला जैश-उल-हिंदच्या नावाने सुरु असणाऱ्या टेलीग्राम अकाउंटबाबत देखील माहिती पडलं आहे.’

‘ज्यामध्ये याच घटनेचा उल्लेख करत एक बॅनर जारी करण्यात आलं आहे. पण आता आम्ही आमच्या या पोस्टरद्वारे स्पष्ट करु इच्छितो की, ‘जैश-उल-हिंद’चा या घटनेशी काहीही संबंध नाही. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील घटना, कथित टेलीग्राम अकाउंट आणि पोस्टर यांचा जैश-उल-हिंदचा काहीही संबंध नाही. आमचं खोटं पोस्टर बनविणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.’ ‘जैश-उल-हिंद हे कधीही क्रुफांकडून पैसे घेत नाही. आमची लढाई भारतीय व्यापार जगतातील व्यक्तींशी नाही. आमची लढाई ही भाजप आणि आरएसएसविरुद्ध आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या कृत्यांच्याविरोधात भारतातील निरपराध मुस्लिमांसाठी लढा देत आहोत. आम्ही शरीयतसाठी लढत आहोत पैशांसाठी नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष लोकशाहीविरुद्ध लढत आहोत अंबानींशी नाही.’

‘जैश-उल-हिंद हे कधीही क्रुफांकडून पैसे घेत नाही. आमची लढाई भारतीय व्यापार जगतातील व्यक्तींशी नाही. आमची लढाई ही भाजप आणि आरएसएसविरुद्ध आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या कृत्यांच्याविरोधात भारतातील निरपराध मुस्लिमांसाठी लढा देत आहोत. आम्ही शरीयतसाठी लढत आहोत पैशांसाठी नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष लोकशाहीविरुद्ध लढत आहोत अंबानींशी नाही.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT