Shiv Sena फुटीमागे आप्पासाहेब धर्माधिकारी? ‘महाराष्ट्र भूषणला’ विरोध
Appasaheb Dharmadhikari ‘Maharashtra Bhushan’ award : मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना गत आठवड्यात २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र या पुरस्काराला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. वर्णभेद आणि अंधश्रद्धा पसरविण्याच्या माणसाला पुरस्कार दिल्याचा आरोप, संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला […]
ADVERTISEMENT
Appasaheb Dharmadhikari ‘Maharashtra Bhushan’ award :
ADVERTISEMENT
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना गत आठवड्यात २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र या पुरस्काराला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. वर्णभेद आणि अंधश्रद्धा पसरविण्याच्या माणसाला पुरस्कार दिल्याचा आरोप, संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे. ते हिंगोलीमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Sambhaji Brigade Oppose to Appasaheb Dharmadhikari ‘Maharashtra Bhushan’ award)
आप्पासाहेब धर्माधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्नेही आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सांगण्यावरुनच झाली का? फूट पडली म्हणून हा पुरस्कार बक्षीस दिला का? अशा आम्हाला शंका आहेत. आम्ही हे सहन करणार नाही, हा पुरस्कार आम्ही देऊ देणार नाही, सरकारने त्यांचा हा पुरस्कार परत घेतला नाही तर राज्यभर संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार असल्याचा इशाराही आखरे यांनी दिला.
हे वाचलं का?
मोठी बातमी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर!
कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी?
समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे निरुपण करण्यासाठी दिवंगत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र डॉ. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ओळखलं जातं. श्री सदस्यांवर आलेल्या प्रत्येक प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभं करणं, तसंच त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे धर्माधिकारी कुटुंबियांचं मूळ कार्य. “श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग” माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३ सालापासून या कार्याची सुरुवात केली होती.
ADVERTISEMENT
Maharashtra Bhushan मिळालेले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी कोण?
ADVERTISEMENT
श्रीबैठकीशिवाय अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी धर्माधिकारी कुटुंबियांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. यासोबतच आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. श्रीसदस्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधन करत असतात.
सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा धर्माधिकारी यांच्यारुपाने धर्माधिकारी कुटुंबियांची तिसरी पिढीही तेवढ्याच तळमळीने याच समाजकार्यात सक्रीय आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने यांच्याकडून विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. २०१७ मध्ये त्यांनी चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT