शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, जालना कारखान्यातल्या जमिनीवर टाच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. ईडीने त्यांच्या जालना येथील साखर कारखान्याची जमीन, इमारत, प्लांट आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी कारखान्याची जमीन, इमारत प्लांट हे सगळं जप्त करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित पीएमएलए अंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती ईडीने दिली आहे.

ADVERTISEMENT

याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील घरी छाप मारण्यात आला होता. तसंच औरंगाबाद शहर आणि इतर जवळपसाच्या भागांमध्ये महाराष्ट्र बँक प्रकरणातच हे छापे मारण्यात आले होते.

मागील दोन महिन्यांपूर्वी ईडीने साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कारखान्यांवर निर्बंध लावण्याचे आदे आदेश ईडीने दिले आहेत. या कारखान्याचा वापर विक्री तसंच व्यवहार करण्यावर हे निर्बंध होते. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणी चौकशी करते आहे.

हे वाचलं का?

एकीकडे राज्यात शिवसेनेत बंड उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या ३६ हून जास्त आमदारांसह बंड करून आसाममध्ये गेले आहेत. शिवसेना हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात शिवसेना आणखी फुटू नये म्हणून उद्धव ठाकरे हे सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. महाराष्ट्र सरकारसमोरही आव्हान उभं राहिलं आहे. त्यात आता अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट २०१९ रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ED ने PMLA अंतर्गत तपास सुरू केला आहे. हा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या २२ ऑगस्ट २०१९ च्या आदेशानुसार नोंदविण्यात आला होता.

ADVERTISEMENT

जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्या आरोप काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली गेली होती. 2012 मध्ये टेंडर काढण्यात आले. नुसत्या जमिनीची रेडीरेकनर व्हॅल्यू 70 कोटी रुपये असताना व्हॅल्यूअरला मॅनेज करून संपूर्ण कारखान्याची लँड, प्लॉट आणि मशनरी प्राईस फक्त 42 कोटी ठेवण्यात आली.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारचे शंभर एकर जमीन एम एस सी बँकेकडे नसतानासुद्धा विकण्यासाठी काढली, खोतकर यांच्या संबंधित तीन कंपन्यांनी यासाठी टेंडर भरले. औरंगाबाद मध्ये छापा टाकण्यात आलेल्या एका उद्योजकाचे आणि व्यावसायिकाचे खोतकर यांच्याशी साखर कारखान्याच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध असल्याचा सोमय्याचा आरोप होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT