अखेर आर्यन खानची ‘मन्नत’वर घरवापसी; शाहरूख खानच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर घरी परतला. आर्यन खानची आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑर्थर रोड तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यात आली. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. शाहरुख खानचा बॉडीगार्ड आर्यन खानला घेण्यासाठी आला होता. त्या गाडीतून आर्यन खान मन्नतवर पोहोचला.

ADVERTISEMENT

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खान 28 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला. दोन वेळा जामीन नाकारण्यात आल्यानंतर आर्यन खान मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला होता. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही आर्यन खानला दोन दिवस ऑर्थर रोड तुरुंगात मुक्काम करावा लागला.

Aryan Khan Bail : जामीन मंजूर करताना कोर्टाने ठेवल्या आहेत ‘या’ 14 अटी

हे वाचलं का?

शुक्रवारी जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावलाने जामीनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आज सकाळी ऑर्थर रोड तुरुंग प्रशासनापर्यंत आर्यन खानच्या जामीनाचे आदेश पोहोचले. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तुरुंग प्रशासनाने आर्यन खानला बाहेर सोडले. यावेळी तुरुंगाच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती.

ऑर्थर रोड जेल ते मन्नत प्रवास बघण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा…

ADVERTISEMENT

आर्यन खानला घेण्यासाठी सकाळी शाहरूख खानचा रवि नावाचा बॉडीगार्ड गाडी घेऊन पोहोचला होता. या गाडीतूनच आर्यन खान मन्नतच्या दिशेने रवाना झाला. शाहरुख खानच्या चाहत्यांची गर्दी पार करत आर्यन 11.40 सुमारास मन्नत बंगल्यावर पोहोचला.

ADVERTISEMENT

‘मन्नत’वर आर्यनच्या स्वागताची तयारी

आर्यन खान 2 ऑक्टोबरपासून घरापासून दूर आहे. तब्बल 28 दिवसांनंतर आर्यन घरी परतला असून, मन्नतवर उत्साहाचे वातावरण आहे. आर्यनच्या स्वागतासाठी कालपासूनच तयारी सुरू झाली होती. शुक्रवारी संपूर्ण घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT