कोरोनाचा जोर पुन्हा वाढल्याने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने शूटींगसाठी जाहीर केली कडक नियमावली
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार शूटींग करणाऱ्या प्रत्येकाने ही नियमावली काटेकोरपणे पाळण्याचं आवाहनही अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. याच गोष्टीची […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार शूटींग करणाऱ्या प्रत्येकाने ही नियमावली काटेकोरपणे पाळण्याचं आवाहनही अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. याच गोष्टीची खबरदारी म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने तातडीने बैठक घेऊन शूटींगदरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेऊन ही नियमावली जाहीर केली आहे.मुंबई,पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांत ज्या ज्या ठिकाणी सध्या शूटींग सुरू आहे. त्या त्या ठिकाणच्या प्रोडक्शनना ही नियमावली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून पाठवण्यात आली असून, सर्व संबंधित चित्रपटांच्या प्रोडक्शन हाऊस,निर्माते,तंत्रज्ञ,कलाकार आणि शूटींग संबंधित सर्वजणांना ही नियमावली काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे नियम न पाळल्यास संबंधित शूटींग तात्काळ बंद करून त्यावर कारवाई होईल असं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
नोव्हेंबर २०२० नंतर कोरोनाचा जोर जेव्हा पहिल्यांदा कमी होऊ लागला तेव्हा महाराष्ट्र सरकारने आखून दिलेल्या नियमावलीनुसार महाराष्ट्रात मालिका, सिनेमा क्षेत्राने पुन्हा एकदा संपूर्णपणे बंद असलेल्या आपल्या प्रोजेक्टसना सुरवात केली. त्यावेळीही योग्य ती खबरदारी घेऊन प्रत्येक सेटवर शूटींगला सुरवातही झाली. याकाळातही अनेक सेटवरील कलाकार,तंत्रज्ञ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सरकारने शूटींगसंदर्भातले नियम अजून कडक केले होते. सेटवर मर्यादित माणसं, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टींना जास्तीत जास्त महत्व देण्यात आलं होतं. सध्या सर्व मराठी,हिंदी आणि इतर भाषिक मालिकांची शूटींग मुंबई,पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागात सुरू आहेत. सध्या अनेक ठिकाणी शूटींगच्या वेळा कमी करून ८ ते ९ तास करण्यात आल्या आहेत. मात्र मार्च महिन्यात अचानक वाढलेल्या कोरोनाच्या केसेसमुळे आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने पुन्हा एकदा कडक पावलं उचलण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलं का?
निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी महत्वाची नियमावली
ADVERTISEMENT
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. आपण चित्रीकरण करताना विशेष काळजी घेवूनच चित्रीकरण करावे.
ADVERTISEMENT
* जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची लेखी परवानगी घेवूनच चित्रीकरण करावे.
* चित्रीकरण स्थळी जेवढी शक्य आहे तेवढी कमी टीम ठेवावी.
* सर्वांनी सोशल डिस्ट्नसिंग पाळावे.
* सेटवर सँनिटायझर, टेम्परेचर गन, ऑक्सिमिटर असणे आवश्यक आहे. तसेच याबाबतीत प्रत्येकाची रोज लेखी नोंद ठेवणे
आवश्यक आहे.
* आपल्या युनिट मधील कोणाचे जवळचे, शेजारी कोरोना पेशंट असतील तर संबंधित व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन रिपोर्ट जवळ
बाळगावा.
* जास्त दिवस शूटिंग असेल तर सगळ्यांची कोरोना टेस्ट करुन घेणे बंधनकारक आहे.
* शूटिंग साहित्य वरचेवर सँनिटाइज करणे आवश्यक आहे
* तंत्रज्ञांनी, कामगार वर्गाने हँड ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावी.
* चहापाणी, नाष्टा, लंच, स्नँक्स व डिनर यासाठी यूज अँन्ड थ्रो परंतु पर्यावरण पूरक साहित्य वापरावे. शक्यतो पँकिंग लंच वा
इतर खाद्यपदार्थ वापरावेत.
* अ.भा.म.चि.महामंडळाच्या भरारी पथकातील सदस्य पाहणी करण्याकरीता आले तर त्यांना सहकार्य करावे.
लक्षात घ्या, आपण खबरदारी घेतली तरच शूटिंग सुरळीत सुरु राहणार आहे. आपले दुर्लक्ष वा हलगर्जीपणा सरकारला शूटिंग बंदी आणण्यासाठी पूरक ठरेल. अशी संधी देवू नका.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT