Vaccine Side Effects: AstraZeneca लसीच्या नव्या साइड इफेक्टने वाढवली चिंता, WHO ने दिला इशारा
WHO ने सोमवारी Janssen (जॉनसन आणि जॉनसन) आणि AstraZeneca सारख्या अॅडिनोव्हायरस वेक्टर कोव्हिड लसींवर चिंता व्यक्त केली आहे. व्हॅक्सीन सुरक्षिततेबाबत बनलेल्या ग्लोबल अॅडव्हायझरी कमिटीने (GACVS)आपल्या निवेदनात ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ (GBS) चा उल्लेख केला आहे. जो एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. यामध्ये, रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराच्या मज्जासंस्थेस हानी पोहोचवू लागते. WHO च्या ग्लोबल अॅडव्हायझरी कमिटीने दिलेल्या इशाऱ्यात […]
ADVERTISEMENT
WHO ने सोमवारी Janssen (जॉनसन आणि जॉनसन) आणि AstraZeneca सारख्या अॅडिनोव्हायरस वेक्टर कोव्हिड लसींवर चिंता व्यक्त केली आहे. व्हॅक्सीन सुरक्षिततेबाबत बनलेल्या ग्लोबल अॅडव्हायझरी कमिटीने (GACVS)आपल्या निवेदनात ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ (GBS) चा उल्लेख केला आहे. जो एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. यामध्ये, रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराच्या मज्जासंस्थेस हानी पोहोचवू लागते.
ADVERTISEMENT
WHO च्या ग्लोबल अॅडव्हायझरी कमिटीने दिलेल्या इशाऱ्यात असे म्हटले होते की, Janssen आणि AstraZeneca लसींच्या डोसने इम्यून सिस्टम डिसॉर्डरची समस्या निर्माण होऊ शकते. हा रोग कमकुवत स्नायू, वेदना, सुन्नपणा आणि पक्षाघात याला कारणीभूत ठरू शकतो.
GACVS ने 13 जुलैला Janssen और AstraZeneca लसीमुळे होणाऱ्या गंभीर लक्षणांच्या अहवालावर 13 जुलै रोजी व्हर्चुअल कॉन्फरन्स घेतली होती. Oxford-AstraZeneca ही लस भारतात कोव्हिशिल्डच्या या नावाने भारतात तयार केली जाते.
हे वाचलं का?
तज्ज्ञांनी सांगितले की, GBS संसर्गासह अनेक कारणांमुळे उद्भवू शकतो. ही समस्या पुरुष आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अधिक दिसून येते. 2011 च्या आढावा आणि मेटा-अॅनालिसिसनुसार युरोप आणि उत्तर अमेरिकेतील एक लाखातील 0.8-1.9 प्रकरणात GB सिंड्रोमचा अंदाज आहे.
WHOओच्या म्हणण्यानुसार, युरोपियन मेडिसन एजन्सीच्या फार्माकोविजिलन्स जोखीम रिस्क एसेस्मेंट कमिटीने (PRAC) 9 जुलै रोजी Vaxzevria (युरोपमध्ये अॅस्ट्रॅजेनेका लस उत्पादित) संबंधित एक निवेदन जारी केलं होतं. यामध्ये लसीकरणानंतर GBS बाबत सावधगिरी बाळगण्याची शिफारस करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
रिपोर्टनुसार 27 जून 2021 पर्यंत लसीकरणानंतर युरोपियन युनियनमध्ये जीबीएसचे एकूण 227 प्रकरणे नोंदली गेली. 20 जून 2021 पर्यंत येथे Vaxzevria मधून 5 कोटींहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
डब्ल्यूएचओने सर्व आरोग्य सेवा व्यावसायिकांना जीबीएससह सर्व प्रकारच्या साइड इफेक्ट्सचे परीक्षण आणि अहवाल देण्याबाबत आग्रह केला आहे. Janssen आणि AstraZeneca लस दिली जात आहे. त्यामध्ये जीबीएसची लक्षणे ओळखण्याची गरज आहे.
Vaccine: ‘दोन वेगवेगळ्या लस घेऊ नका, धोकादायक ठरु शकतं’, WHO चा इशारा
डब्ल्यूएचओच्या मते, अशा लोकांना चालण्यास त्रास होऊ शकते. अशा लोकांच्या चेहऱ्याच्या प्रतिक्रियेत बदल होऊ शकतो. तसेच मूत्राशय किंवा आतड्यांशी संबंधित समस्या असू शकते. दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितले की, जीबीएसचे बहुतेक रुग्ण या आजारापासून पूर्णपणे बरे होऊ शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT