प्रजासत्ताक दिनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

संपूर्ण देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे. अशात बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड पोलीस मुख्यालयावर एका इसमाने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. झेंड्याच्या समोरच अंगावर डिझेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बीड शहरातील पंचशील नगर भागातील रस्त्याच्या बोगस कामाची तक्रार करूनही कारवाई न झाल्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे. विनोद शेळके असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नावं आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोर आणि झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

साताऱ्यातही महिलेचा आत्महदहनाचा प्रयत्न

ADVERTISEMENT

साताऱ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलावडे या महिलेनेही आत्महदनचा प्रयत्न केला. जावळी सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप या महिलेने केला असून संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करण्याची मागणी तिने केली होती. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने हे पाऊल उचललं असंही कळतं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT