भावाने कोयत्याचे वार करत बहिणीचं शीर केलं धडावेगळं आणि ओरडला.. औरंगाबादच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला
इसरार चिश्ती, प्रतिनिधी औरंगाबाद औरंगाबादमधल्या वैजापूरमध्ये घटनेने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. सख्ख्या लहान भावाने बहिणीची हत्या केली ती देखील कोयत्याने वार करून. एवढंच नाही त्यापुढे जे घडलं ते आणखी धक्कादायक आहे. ते सगळं वास्तव आता समोर आलं आहे. बहिणीचं शीर धडावेगळं करून तिच्या भावाने ते सासरच्यांन दाखवलं आणि ओरडू लागला अखेर तिला संपवलं. क्रौर्याची परिसीमा […]
ADVERTISEMENT
इसरार चिश्ती, प्रतिनिधी औरंगाबाद
ADVERTISEMENT
औरंगाबादमधल्या वैजापूरमध्ये घटनेने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. सख्ख्या लहान भावाने बहिणीची हत्या केली ती देखील कोयत्याने वार करून. एवढंच नाही त्यापुढे जे घडलं ते आणखी धक्कादायक आहे. ते सगळं वास्तव आता समोर आलं आहे. बहिणीचं शीर धडावेगळं करून तिच्या भावाने ते सासरच्यांन दाखवलं आणि ओरडू लागला अखेर तिला संपवलं. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेने औरंगाबाद सुन्न झालं आहे.
हे वाचलं का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किर्ती मोटे या तरूणीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. तिचा भाऊ अल्पवयीन आहे. आईने आणि मुलाने मिळून ही हत्या केली असं पोलिसांनी सांगितलं आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगाव या ठिकाणी ही धक्कादायक आणि भयंकर घटना घडली. सहा महिन्यांपूर्वी किर्तीने प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मनात धरून या दोघांनी मुलीला ठार केलं. जी मृत्यू झालेली मुलगी तिचं वय 19 वर्षे होती. मुलगी तिच्या घरी राहून शेती करत होती. सगळं कुटुंब सोबत राहात होतं.
औरंगाबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून बहिणीला कोयत्याने गळा चिरून संपवलं
ADVERTISEMENT
किर्ती जेव्हा चहा करण्यासाठी जेव्हा स्वयंपाक घरात गेली होती. त्याचवेळी तिच्या आईने आणि भावाने तिच्यावर वार केले. तिचं शीर धडावेगळं केलं आणि व्हरंड्यात आणून ठेवलं. तिचा भाऊ ओरडला आणि सासरच्यांना सांगू लागला बघा हिला मी ठार केलं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना घडल्यानंतर गावातून फोन आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. Additional SP डॉ. पवन बनसोड यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्…; धडावेगळं केलेलं शीर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला ‘पाहा, हिचं काय केलं’
किर्ती उर्फ किशोरी मोटे ही शेतात होती. आई आणि भाऊ आल्याचं ऐकून तिला खूप आनंद झाला होता. तेच आपल्या जीवावर उठणार आहेत याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. किर्तीने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग या दोघांच्याही मनात होता. म्हणूनच या दोघांनी तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आणि तिला संपवलं. कोयत्याने वार करून तो थांबला नाही तिचं मुंडकं त्याने वरंड्यात आणून टाकलं आणि सासरच्यांंना ओरडून सांगितलं की बघा मी हिला संपवलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT