त्यांना ‘गुलाम’ नाही, ‘आझाद’ राहायचंय; भट्टाचार्यांच्या पुरस्कार वापसीवरून काँग्रेस नेत्याचा आझादांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री तथा कम्यनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला. मात्र, पुरस्कारांची घोषणा होताच बुद्धदेव भट्टाचार्य यांनी भूमिका मांडत पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. भट्टाचार्य यांच्या या निर्णयावरून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मात्र, गुलाम नबी आझाद यांच्यावर प्रत्यक्षपणे निशाणा साधला.

ADVERTISEMENT

पद्म पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींबरोबरच काही राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचीही निवड करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री बुद्धीदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी म्हटलं होतं की, ‘पद्म भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दलची मला कोणतीही कल्पना नाही. मला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जर मला पुरस्कार देण्यात आला असेल, तर तो स्वीकारण्यास माझा नकार आहे’, असं त्यांनी म्हटलं होतं.

हे वाचलं का?

प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराचे मानकरी कोण-कोण

भट्टाचार्य यांच्या निर्णयाची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी एक ट्वीट केलं. ज्यात भट्टाचार्य यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याबरोबरच त्यांनी अप्रत्यक्षपणे गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला. ‘चांगलं काम केलं. त्यांना गुलाम म्हणून नाही, तर आझाद (स्वतंत्र) राहायचं आहे’, असं जयराम रमेश म्हणाले. त्यांचं हे ट्वीट चांगलं चर्चेत आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

बंगाली गायिका संध्या मुखर्जींचाही नकार

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याबरोबर बंगालमधील प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांनीही पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. मंगळवारी दुपारी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी मुखर्जी यांना पुरस्काराबद्दलची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला.

संध्या मुखर्जी दक्षिण कोलकाता भागातील लेक गार्डन परिसरात राहतात. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. पद्मश्री पुरस्कार हा माझ्यासारख्या ज्येष्ठ गायिकेला देण्यासारखा नाही. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे अपमानासमान आहे, असं गायिकेच्या निकटवर्तीयांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT