माफी मागा अन्यथा गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जा IMA ने रामदेवबाबांना दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगगुरू रामदेवबाबा यांनी जर IMA ची मागणी मान्य केली नाही तर IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन रामदेवबाबांच्याविरोधात एक हजार कोटींचा मानहानीचा दावा करणार आहे. योगगुरू रामदेवबाबा यांना एक हजार कोटी रूपयांचा मानहानीचा दावा केला जाईल यासंदर्भातली नोटीस रामदेवबाबांना बुधवारीच पाठवण्यात आली आहे. पंधरा दिवसांच्या आत माफी मागा अन्यथा या कायदेशीर कारवाईला तयार राहा असंही IMA ने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

आणखी काय म्हटलं आहे IMA च्या नोटीसमध्ये?

IMA ने म्हटलं आहे की रामदेवबाबांना अॅलोपॅथीचा A ही ठाऊक नाही तरीही आम्ही त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयर आहोत. मात्र आधी त्यांची योग्यता काय आहे ते त्यांनी सिद्ध करावं. रामदेवबाबा हे वारंवार त्यांच्या औषधांचा प्रचार करण्यासाठी आपल्या चुकीच्या वक्तव्यांमधून अफवा पसरवत आहेत. रामदेवबाबांनी असा दावा केला आहे की त्यांनी त्यांच्या औषधांच्या चाचण्या रूग्णालयांमध्ये केल्या आहेत. आम्ही त्यांना हे विचारू इच्छितो की त्यांनी नेमक्या कोणत्या रूग्णालयांमध्ये या चाचण्या केल्या आहेत त्याची यादी आम्हाला सोपवावी. जर त्यांनी ही यादी दिली नाही तर याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी चाचण्या केलेल्याच नाहीत.

हे वाचलं का?

Allopathy डॉक्टर्स विरुद्ध रामदेव बाबा वाद चिघळला, २५ प्रश्न विचारत रामदेव बाबांचं IMA ला आव्हान

बाबा रामदेव यांनी काय वक्तव्य केलं होतं?

ADVERTISEMENT

एक हजार डॉक्टर कोरोना लसीचे डोस घेऊनही मेले.. हे कसले डॉक्टर? जे स्वतःला वाचवू शकले नाहीत त्यांच्या डॉक्टर असण्याला काय अर्थ आहे? allopathy हे एक स्टुपिडिटी आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर स्वामी रामदेवसारखं बना ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाही आणि तरीही सगळ्याचा डॉक्टर आहे.

ADVERTISEMENT

बाबा रामदेव यांनी केलेले हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. ज्यानंतर IMA ने त्यांना नोटीसही पाठवली. FAIMA ने असं म्हटलं आहे की आम्ही सगळ्या देशातील निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनच्या वतीने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवत आहोत. तसंच बाबा रामदेव यांनी जे वक्तव्य Allopathy बाबत केलं त्याचा आम्ही तीव्र निषेध नोंदवतो.

रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

एवढंच नाही तर FAIMA ने असंही म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी आपला दावा मागे घेतल्याचे पुरावे द्यावेत किंवा जाहीरपणे माफी मागावी. या दोन्हीपैकी एकही पर्याय जर त्यांनी स्वीकारला नाही तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणारच अशी आक्रमक भूमिका FAIMA ने घेतली आहे. ही भूमिका घेतल्यानंतर बाबा रामदेव यांनी माफीही मागितली. मात्र या संदर्भात जे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलतीच बंद केली. हा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT