‘बोलबच्चन, फेसबुक लाईव्ह’! बच्चू कडूंनी उद्धव ठाकरे-राज ठाकरेंनाच दिले पक्षवाढीचे ‘धडे’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडूंनी एका भाषणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. बोलबच्चन, फेसबुक लाईव्ह चा उल्लेख करत बच्चू कडूंनी दोन्ही ठाकरेंना अप्रत्यक्षपणे पक्ष वाढीचे धडे दिले.

ADVERTISEMENT

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांचं भाषण झालं. भाषण करताना बच्चू कडूंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर नामोल्लेख न करता उपरोधिक टोलेबाजी केली.

बच्चू कडूंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर काय केलीये टीका?

भाषणात बच्चू कडू म्हणाले, “मित्रानों, जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढायला वेळ लागत नाही. सहज पक्ष वाढतो. मधल्या काळात आपण मनसेचं बघितलं. महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा असं स्लोगन होतं. पण तू कुठं इथं आहे बाबा. निव्वळ बोलण्यानं मत थोडी जमत असतात. लोकांनी 13 आमदार निवडून दिले होते. 13 आमदार महाराष्ट्र विसरून गेले.”

हे वाचलं का?

सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार? हकालपट्टीच्या मागणीनंतर वारकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, “बच्चू कडू 4 वेळा निवडून आला. जातीचं सोंग नाही. जातीचा झेंडा नाही. धर्माचा झेंडा नाही. कुठलाही नेता बोलावला नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी देशामध्ये इतिहास आणि अपक्ष माणूस एकदा नाही, तर 4 वेळा निवडून दिला. त्याचं काम आणि काम महत्त्वाचं”

ADVERTISEMENT

राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना बच्चू कडूंनी केला सवाल

“ज्याला पाय नाही. हात नाही. डोळे नाहीत. ज्याला ऐकायला येत नाही, त्याचं संघटन बांधायला महाराष्ट्रभर बच्चू कडू फिरला. त्यांच्या वेदना विधानसभेत मांडल्या. 350 गुन्हे दाखल आहेत. विचारा राज ठाकरेंवर किती गुन्हे दाखल केले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर आहेत का गुन्हे दाखल? निव्वळ फेसबुकर येऊन गोड गोड गोष्टी करून थोडं चालतं. पोट थोडं भरते”

ADVERTISEMENT

राणा-कडू वादानंतर मुख्यमंत्री शिंदेंचे बच्चू कडूंना झुकते माप? एकाच महिन्यात दुसरे गिफ्ट

“घरी जाऊन स्वयंपाक केला नाही आणि आईला सांगितलं कोबीची भाजी चांगली झाली, पण ताटात कुठेय? ताटात आणावं लागेल ना. बोलबच्चन करून थोडं होतं. कर्तव्य पार पाडावं लागतं. मेहनत करावी लागते. धावपळ करावी लागते”, असं म्हणत बच्चू कडूंनी अप्रत्यक्षपणे दोन्ही ठाकरेंना लक्ष्य केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT