बप्पी लहरी आपल्यामागे किती संपत्ती सोडून गेले? Telsa समवेत अनेक महागड्या कार्सचंही कलेक्शन
डिस्को आणि पॉप हा प्रकार भारतीय संगीतामध्ये रूजवणारे आणि तो हिट करून दाखवणारे बप्पी लहरी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. श्वास घेण्याचा त्रास होत असल्याच्या आजाराने त्यांचं निधन झालं आहे. आपल्या आवाजाची आणि संगीताची जादू चार दशकांहून अधिक काळ कायम ठेवणाऱ्या या संगीतकाराने एक्झिट घेतली आहे. आपण जाणून घेणार आहोत की गोल्डन मॅन अशी ओळख असणारे […]
ADVERTISEMENT
डिस्को आणि पॉप हा प्रकार भारतीय संगीतामध्ये रूजवणारे आणि तो हिट करून दाखवणारे बप्पी लहरी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. श्वास घेण्याचा त्रास होत असल्याच्या आजाराने त्यांचं निधन झालं आहे. आपल्या आवाजाची आणि संगीताची जादू चार दशकांहून अधिक काळ कायम ठेवणाऱ्या या संगीतकाराने एक्झिट घेतली आहे. आपण जाणून घेणार आहोत की गोल्डन मॅन अशी ओळख असणारे बप्पीदा हे त्यांच्या मागे किती संपत्ती सोडून गेले आहेत?
ADVERTISEMENT
बप्पी लहरी यांच्याकडे आलिशान कार्सचं कलेक्शन
हे वाचलं का?
बप्पी लहरी यांच्याबाबत माहिती देणाऱ्या Caknowledge या पोर्टलनुसार अनेक शानदार कार्सचं कलेक्शन बप्पीदांकडे होतं. त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक उंची कार्स होत्या. त्यातल्या पाच कार या त्यांना खूप आवडत. BMW, AUDI या कार्सचं त्यांच्याकडे कलेक्शन होतं. नुकतीच त्यांना Telsa X ही कारही घेतली होती. या कारची किंमत 55 लाख रूपये आहे. टेस्ला कार भारतात विकली जात नाही. ही कार बाहेरून आयात करावी लागते. देशातल्या काही ठराविक लोकांकडेच ही कार आहे. मुकेश अंबानी यांच्याकडेही Telsa कार आहे.
याच पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार डिस्को डान्सर हे गाणं कंपोज करणारे बप्पीदा हे कमाईतही अग्रेसर होते. एका शोसाठी ते 20 लाख रूपये घेत असत. तर एक गाणं कंपोज करण्यासाठी साधारण 8 ते 10 लाख रूपये घेत असत. त्यांनी 11.3 कोटींची गुंतवणूक केली होती. बप्पीदांचं वार्षिक उत्पन्न 2.2 कोटी रूपये होतं. या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार बप्पी लहरींचं नेटवर्थ 3 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 22 कोटी रूपये होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सोन्याच्या दागिन्यांचे प्रचंड शौकिन असलेले बप्पीदा हे त्यांच्या चॅरिटीसाठीही ओळखले जात. ते अनेकदा चॅरिटी शो करत असत. दशातल्या सर्वात जास्त कर भरणाऱ्या लोकांपैकी बप्पी लहरी एक होते. बप्पी लहरी हे एकटे असे संगीतकार आहेत ज्यांना पॉपचा बादशहा किंवा पॉपचा देव असं ज्याला जगात संबोधलं जातं त्या मायकल जॅक्सनने बोलावलं होतं. बप्पीदांचं नाव गिनिज बुकातही नोंदवलं गेलं आहे. कारण 1986 मध्ये बप्पी लहरी यांनी 33 सिनेमांसाठी 180 हून जास्त गाणी वर्षभरात रेकॉर्ड केली होती. असं करणारे ते एकमेव संगीतकार होते त्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुकातही गेलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT