बारामती: महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे, बारामती: बारामती शहरातील महावितरण सहाय्यक अभियंत्याने स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनीष माधवराव दंडवते ( वय 43 वर्ष) असे या अभियंत्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडवते हे दोन दिवसांपासून कामावर हजर नव्हते. येथील वर्ग दोन बिल्डिंग फ्लॅट नंबर (अ 6) तिसरा मजला उर्जा भवन कर्मचारी वसाहत येथे ही घटना घडली आहे. शनिवारी (5 फेब्रुवारी) सकाळी डबेवाला त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी आला. मात्र, दंडवते यांनी दरवाजा उघडला नाही. प्रतिसाद न मिळाल्याने डबेवाल्याने खिडकीतून आत डोकावून आत पाहिले. यावेळी त्याला दंडवते यांनी किचनमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

आतील दृश्य पाहून डबेवाल्याला प्रचंड धक्का बसला. यामुळे त्याने तात्काळ या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे वाचलं का?

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी दंडवते यांचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे दरवाजा तोडून दंडवते यांचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह खाली घेण्यात आला.

नागपूर : गरीब घरात लग्न लाऊन दिल्यामुळे नैराश्यातून विवाहीतेची आत्महत्या

ADVERTISEMENT

शवविच्छेदनासाठी सिल्वर जुबली याठिकाणी दंडवते यांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. अभियंता दंडवते हे या ठिकाणी कुटुंबाशिवाय राहत होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी राहण्यास होते. घटनेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलेली आहे. मात्र दंडवते यांनी आत्महत्या का केली याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तसंच कोणतीही सुसाइड नोटही याठिकाणी सापडलेली नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT