Sanjay Rathod ना विरोध केलात तर परिणाम भोगावे लागतील, पोहरादेवीच्या महंतांचा BJP ला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उदय सामंतांनी संजय राठोड मंत्रीमंडळात पुनरागमन करु शकतात असे संकेत दिले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राठोडांना मंत्रीमंडळात स्थान दिलं तर राज्यभरात आंदोलनं करु असा इशारा दिला होता. पोहरादेवी संस्थानाचे मंहत सुनील महाराज यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

“माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील कोणतेच आरोप सिद्ध झाले नाहीत. तीन महिने उलटून गेले तरीही राठोड यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल नाही. मग तरीही चंद्रकांतदादा पाटील कोणाविरुद्ध आंदोलन करणार आहेत? त्यांचं आंदोलन बंजारा समाजाविरुद्ध आहे का? असं असेल येणाऱ्या काळात बंजारा समाजच भारतीय जनता पार्टीला उत्तर देईल, याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील.”

पोहरादेवी संस्थान हे बंजारा समाजाचं आराध्य दैवत मानलं जातं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर त्यांनी कोरोनाकाळात पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन केलं होतं. ज्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लागला होता. त्यावेळीही पोहरादेवीच्या महंतांनी राठोड यांना राजीनामा न देण्याची विनंती केली होती. त्यातच उदय सामंत यांच्यासारख्या शिवसेना नेत्याने संजय राठोड यांच्या पुनरागमनाचे संकेत दिल्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT