महाराष्ट्रातील IT तरुण आणि त्याच्या प्रेग्नंट बायकोचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, रक्ताच्या थारोळ्यात सापडले पती-पत्नी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

न्यू जर्सी (अमेरिका): नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा संशयितरित्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय वेळेनुसार बुधवार (7 एप्रिल) रोजी रात्री या दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दाम्पत्याने आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ADVERTISEMENT

सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी सुखरूप आहे. बालाजी भारत रूद्रवार (वय ३२) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय ३०) असे या मयत पती-पत्नीची नावे आहेत. अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता.

बालाजी आणि आरती हे अमेरिकेतील न्यू जर्सीतील अर्लिंग्टन येते गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. अचानक पती पत्नीच्या मृत्यूने त्यांच्या भारतात राहणाऱ्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आरती रुद्रवार ही सात महिन्यांची गर्भवती असल्याचं देखील समोर आलं आहे. या दोघांच्याही मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.

हे वाचलं का?

चार वर्षांची मुलगी सुखरुप

ADVERTISEMENT

सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी सुखरूप आहे. बालाजी भारत रूद्रवार (वय ३२) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय ३०) असे या मयत पती-पत्नीची नावे आहेत. अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता.

ADVERTISEMENT

रुद्रवार दाम्पत्याची 4 वर्षीय मुलगी जेव्हा बाल्कनीत बसून रडत होती तेव्हा शेजाऱ्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यावेेळी जेव्हा त्यांनी घरात डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत स्थानिक पोलिसांनी माहिती दिली. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

रुद्रवार दाम्पत्य अनेक वर्षापासन होते अमेरिकेत स्थायिक

बालाजी आणि आरती हे अमेरिकेतील न्यू जर्सीतील अर्लिंग्टन येते गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. अचानक पती पत्नीच्या मृत्यूने त्यांच्या भारतात राहणाऱ्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आरती रुद्रवार ही सात महिन्यांची गर्भवती असल्याचं देखील समोर आलं आहे. या दोघांच्याही मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री

एका उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील दोन जणांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सध्या सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बालाजी यांच्या वडिलांनी ‘मुंबई तक’ने संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबत अशी माहिती दिली की, ‘बालाजीचा दोन दिवसापूर्वी फोन आला होता. पण त्यावेळी आमची घरगुती चर्चा झाली होती. तेव्हा तो काही तणावात होता असं देखील वाटलं नव्हतं. आम्हाला मृतदेह इकडे मिळण्यासाठी 9 ते 10 दिवस लागतील त्यामुळे त्यांच्यावर तिथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’

दुसरीकडे रुद्रवार दाम्पत्याच्या चार वर्षीय मुलीला भारतात परत आणण्याचे सध्या प्रयत्न सुरु आहेत. चार वर्षीय मुलगी ही सध्या न्यू जर्सीमध्येच आहे. बालाजीच्या एका मित्राकडे ती असल्याचं समजतं आहे.

पुण्यात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, गोळी झाडून ठार करण्याचाही प्रयत्न

कोण आहे बालाजी रुद्रवार

बालाजी रुद्रवार हा मूळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा रहिवासी होता. त्याचं डिसेंबर 2014 साली आरतीशी लग्न केलं होतं.

दरम्यान, ऑगस्ट 2015 मध्ये हे दाम्पत्य अमेरिकेला गेले होते. बालाजी हा तेथील एका आयटी कंपनीमध्ये काम करत होता. तर आरती ही एक गृहिणी होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT