फोटो स्टुडिओमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांकडून बलात्कार
बीड: बीड जिल्ह्यातील धारूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याच प्रकरणी आता धारुर पोलिसात दोन आरोपींविरुध्द आज (16 फेब्रुवारी) सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणी आरोपींचा कसून शोध घेत आहेत. नेमकं प्रकरण काय? पिडितेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या जबाबानुसार नृसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी […]
ADVERTISEMENT
बीड: बीड जिल्ह्यातील धारूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याच प्रकरणी आता धारुर पोलिसात दोन आरोपींविरुध्द आज (16 फेब्रुवारी) सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणी आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
पिडितेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या जबाबानुसार नृसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली असता यातील आरोपी याने पासपोर्ट फोटो काढून त्यादिवशी न देता फिर्यादीला दुसर्यादिवशी स्टुडिओमध्ये बोलावलं. त्यानंत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच सदर गोष्ट कोणास सांगितली तर मी तुझ्या भावाला जीवे मारुन टाकेल अशी धमकी देखील आरोपीने दिली.
हे वाचलं का?
तर नृसिंह फोटो स्टुडिओमधील फोटो काढणाऱ्या पहिल्या आरोपीने आपल्या एका मित्राला या घटनेबाबत सांगितलं होतं. त्यामुळे त्याने देखील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पहिला आरोपी हा फोटो काढण्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला असताना दुसऱ्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी त्याने देखील मुलीला दिली.
अखेर या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर पीडित मुलीने पोलिसात धाव घेतली. ज्यानंतर धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अत्याचारग्रस्त मुलीच्या तक्रारी वरून आरोपी मधूर बाळासाहेब फरतडे व सहदेव चाळक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 376, 504 भादंवि व कलम 4, 5 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
सध्या या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही. एस आटोळे करीत आहेत. मात्र, अशाप्रकारे आपल्याच फोटो स्टुडिओमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण, सहा महिन्यांत 400 हून अधिकांनी केले अत्याचार
राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या पतीसह वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपींना गजाआड केलं होतं.
गेल्या आठा महिन्यांच्या काळात या पीडित मुलीवर 400 पेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केले आहेत, ज्यात एका पोलिसाचाही समावेश असल्याची माहीती प्रथमवर्ग दंडाधिकारी डॉ. अभय वनवे यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना दिली होती.
बीड : दोन तरुणींनी तरुणाच्या घरी जाऊन केला विनयभंग; अंबाजोगाईत 3 जणांविरुद्ध गुन्हा
संबंधित अल्पवयीन मुलगी 20 आठवड्याची गर्भवती राहिल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशिल कांबळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरुन हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.
पीडित मुलीची आई ती लहान असतानाच वारली. पीडित मुलगी सातवीपर्यंत शिकलेली आहे. वसतीगृहात राहत असताना 7वी नंतर वडील मला गावी घेऊन गेले. त्यानंतर लगेच अंदाजे 19 मे 2018 च्या दरम्यान पीडित मुलगी 13 वर्षांनी असताना बळजबरीने तिचं लग्न लावून देण्यात आलं. सासरी नवरा संभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे रहायला आली. परंतू वडिलांनी देखील तिला संभाळण्यासाठी नकार दिला.
अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बसस्थानकांवर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले असल्याचे संबंधीत अल्पवयीन मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले होते.
अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे दिलेल्या जबाबात म्हटले होते की, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केला. याबाबत मी तक्रार घेवून अंबाजोगाई येथील पोलीस ठाण्यात अनेकवेळा गेले मात्र संबंधित पोलिसांनी मला अनेकदा तेथून हूसकावून लावले. माझे म्हणणे ऐकून सुध्दा दोषीवर कारवाई केली नाही. एवढेच नाही तर एका पोलीस कर्मचाऱ्याने देखील माझ्यावर अत्याचार केलेला आहे.असे त्या पीडित अल्पवयीन मुलीने जबाबात म्हटले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT