एकीकडे ओमिक्रॉनची भीती, दुसरीकडे अफ्रिकेतून परतलेले 10 परदेशी नागरिक बेपत्ता, फोनही बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बंगळुरू: दक्षिण आफ्रिकेतील 10 परदेशी नागरिक कर्नाटकातील बेंगळुरू येथे बेपत्ता झाले आहेत. बंगळुरू महानगरपालिका आणि आरोग्य अधिकारी त्यांच्याशी अद्यापही संपर्क साधू शकलेले नाहीत. वास्तविक, बंगळुरूमध्येच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा भारतातील पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण देखील नुकताच द. अफ्रिकेतून भारतात परतला होता. अशा वेळी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या नागरिकांशी संपर्क होत नसल्याने प्रशासनाची प्रचंड चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

या सर्व परदेशी नागरिकांची दक्षिण अफ्रिकेतील ट्रॅव्हल हिस्ट्री सापडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सर्वात चिंतेची बाब म्हणजे या सर्वांचे फोन देखील स्विच ऑफ येत आहेत. त्यामुळे या सर्वांना शोधण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत.

त्याच वेळी, बंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले की, ‘सर्व परदेशी नागरिक दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. त्यांचे फोनही बंद असल्याचं समजतं आहेत. मात्र, असं असलं तरीही आरोग्य विभाग त्यांचा सातत्याने शोध घेत आहे.’

हे वाचलं का?

अफ्रिकेतून 57 प्रवासी बंगळुरूमध्ये

एकीकडे द. अफ्रिकेत सापडलेला खतरनाक ओमिक्रॉन व्हेरिएंट हा संपूर्ण जगाची चिंता वाढवत असताना आता भारतात देखील त्याची एंट्री झाली आहे. अशावेळी 57 प्रवासी दक्षिण अफ्रिकेतून बंगळुरूला आले आहेत. 47 जणांची चाचणी घेण्यात आली आहे. पण त्यापैकी 10 जणांना शोधण्यात बंगळुरू प्रशासन असमर्थ ठरत आहेत. दरम्यान, या प्रवाशांनी विमानतळावर दिलेल्या पत्त्यावरही ते सापडलेले नाहीत. त्यामुळे कर्नाटक सरकारची चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

भारतात सापडले ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण

ADVERTISEMENT

आतापर्यंत, 29 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित झालेले रूग्ण सापडले आहेत. WHO ने या ओमिक्रॉनला व्हेरिएंट ऑफ कंसर्न कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. दक्षिण अफ्रिकेत या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वप्रथम आढळून आला होता. हा व्हेरिएंट आता भारतातही दाखल झाला आहे.

गुरुवारी, बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनचे व्हेरिएंटने संक्रमित झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाचे वय 66 आणि दुसऱ्या रुग्णाचे वय 46 वर्ष आहे. दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. याशिवाय या सर्व रुग्णांच्या संपर्काची आलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Omicron Variant: अखेर भारतातही झाली ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री, ‘या’ राज्यात सापडले 2 पॉझिटिव्ह

देशातील प्रसिद्ध डॉक्टर आणि मेदांता हॉस्पिटलचे संस्थापक डॉ नरेश त्रेहान यांनी या व्हेरिएंटबद्दल सांगताना असं म्हटलं होतं की, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट संक्रमित एक व्यक्ती तब्बल 18 ते 20 लोकांना संक्रमित करू शकतो.

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे लोकांना संसर्ग झाल्याची बातमी समोर आल्यानंतर केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा निर्णय पुढे ढकलला आहे.

देशात ओमिक्रॉन संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन अलर्ट जारी केला होता आणि सर्व राज्यांना बाहेरून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT