भगतसिंह कोश्यारींचा अमित शाहांकडे माफीनामा? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या विरोधकांच्याच नव्हे, तर भाजप खासदारांच्याही रडारवर आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी या विधानानंतर तीव्र झाली असून, खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधानांना पत्र दिली होती. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी […]
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या विरोधकांच्याच नव्हे, तर भाजप खासदारांच्याही रडारवर आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी या विधानानंतर तीव्र झाली असून, खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधानांना पत्र दिली होती. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी या मुद्द्यावर मौन सोडलं आहे.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केंद्र सरकारकडे होत आहे. या प्रकरणावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं. त्यानंतर आज कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेलं पत्र समोर आलंय. हे पत्र 6 डिसेंबर रोजी लिहिलेलं आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी अमित शाहांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?
अमित शाहांना लिहिलेल्या पत्रात भगतसिंह कोश्यारी म्हणतात, “जसं की आपल्याला माहितीये की, काही दिवसांपूर्वी एका विद्यापीठात मी दिलेल्या भाषणातील छोटा भाग संपूर्ण संदर्भासह न देता काही लोकांनी राज्यपालांना टीकेचा विषय बनवलं आहे.”
हे वाचलं का?
“तरुण पिढीसमोर त्यांच्या आदर्श व्यक्तींची उदाहरणं असतील, तर ते त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. मी विद्यार्थ्यांना सांगितलं की, जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो, तेव्हा विद्यार्थी काही विद्यार्थी महात्मा गांधी, काही विद्यार्थी पंडित नेहरू, तर काही विद्यार्थी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानून उत्तर द्यायचे.”
“स्वाभाविकपणे सध्याच्या तरुणाला सध्याच्या पिढीतील कर्तृत्वान व्यक्तींचं उदाहरण हवं असतं. महाराष्ट्राच्या संदर्भाने बोलताना मी म्हणालो होतो की, आजच्या संदर्भाने डॉ. भीमराव आंबेडकरांपासून नितीन गडकरींपर्यंत चांगली उदाहरणं असू शकतात. याचा अर्थ तर हाच होता की विद्यार्थी डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा यासारख्या व्यक्तींचा आदर्श घेऊ शकतात.”
ADVERTISEMENT
“आज जर कुठला तरुण या व्यक्तींना, विशेषतः जगभरात भारताचं नाव उंचावत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदर्श मानत असेल, तर याचा अर्थ पूर्वीच्या महापुरुषांचा अपमान केला असा तर नाही ना होतं? हा काही तुलनेचा विषय नाहीये.”
ADVERTISEMENT
“राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर ते केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाचा गौरव आहेत. मी या वयातही, तेही कोविड काळात जेव्हा मोठंमोठे लोक आपल्या घरातून बाहेर पडत नव्हते, तेव्हा शिवनेरी, सिंहगड, रायगड व प्रतापगड यासारख्या पवित्र स्थळांचं पायी जाऊन दर्शन घेतलं.”
“मी शिवाजी महाराजांसारख्या वंदनीय पुत्राला जन्म देणाऱ्या माता जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा येथे जाऊनही दर्शन घेणारा मागील 30 वर्षाच्या काळातील पहिला राज्यपाल आहे. तेही हवाई मार्गे नाही, तर गाडीने गेलो. म्हणजे मला इतकंच सांगायचं आहे की, शिवाजी महाराज माझ्यासाठी कायम प्रेरणास्त्रोत राहिले आहेत.”
“अमित भाई, तुम्हाला माहितीये की 2016 मध्ये जेव्हा मी हल्दानी येथून 2019 मध्ये निवडणूक न लढण्याची, तसेच राजकीय पदांपासून दूर जाण्याची निर्णय जाहीर केला होता. पण, पंतप्रधान आणि तुमचा माझ्यासारख्या छोट्या कार्यकार्त्यावर असलेल्या विश्वासामुळे महाराष्ट्रासारख्या महान राज्याचं राज्यपाल पद स्वीकारलं होतं.”
“तुम्हाला माहितीये की, जर माझ्याकडून अनावधानाने काही चूक झाली तर मी लगेच दिलगिरी व्यक्त करण्याबद्दल वा माफी मागण्याबद्दल संकोच बाळगत नाही. मुघल काळात शौर्य, त्याग आणि बलिदानाचं उदाहरण ठेवणाऱ्या महाराणा प्रताप, श्री गुरू गोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या व्यक्तींचा अपमान करण्याची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. माझी आपल्याला विनंती आहे की, सद्यस्थितीत योग्य मार्गदर्शन करावं.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT