भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावरून जाणार?; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनीच दिले संकेत
महाराष्ट्रात सध्या भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे. विरोधी पक्ष, विविध संघटनांसह भाजपचे खासदार उदयनराजे यांनी थेट रायगडावरून जाऊन भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलीये. भगतसिंह कोश्यारी यांना परत बोलावलं जाणार का? अशी प्रश्नार्थक चर्चा महाराष्ट्रात सुरू असतानाच सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाचं विधान केलंय. […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात सध्या भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे. विरोधी पक्ष, विविध संघटनांसह भाजपचे खासदार उदयनराजे यांनी थेट रायगडावरून जाऊन भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलीये. भगतसिंह कोश्यारी यांना परत बोलावलं जाणार का? अशी प्रश्नार्थक चर्चा महाराष्ट्रात सुरू असतानाच सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाचं विधान केलंय.
ADVERTISEMENT
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील भवानी पेठेतील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर मेळावा पार पडला. त्या मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपचे अनेक नेतेमंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सतत वादग्रस्त विधानं करीत आहेत. त्यामुळे विरोधक, विविध संघटना आणि उदयनराजे आक्रमक झाले आहेत, असा मुद्दा उपस्थित केला.
या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना कोणत्याही पक्षाचा मग छोटे असो किंवा मोठे, नेता किंवा कार्यकर्ता असो त्यांनी तारतम्य ठेवावं. कुणीही अवमान करू नये. हे आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची मक्तेदारी नाही. ते संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल मान राखने हे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे”, असं गोगावले यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून जाणार! ‘मुंबई Tak’कडे मोठी बातमी
“उदयनराजे यांनी कालच आक्रोश केला आहे. आता त्याचे परिणाम काय होतात हे लवकरच पाहुयात. तसेच राज्यपाल आता जाण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच दिवसात ते जातील. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे,” असं विधान भरत गोगावले यांनी केलं.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज : भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधानं
‘समर्थ रामदास नसते, तर शिवरायांना कुणी विचारलं असतं?’, या विधानामुळे वादात सापडलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, असं विधान केलं.
ADVERTISEMENT
‘कोण तो राज्यपाल.. तो कधी मोठा नव्हताच…’, उदयनराजेंना संताप अनावर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानांवर बोट ठेवत विरोधकांनी भाजपबरोबरच शिंदे गटाचीही कोंडी केली आहे. शिंदे गटाकडून राज्यपालांच्या भूमिकेबाबत सावध प्रतिक्रिया दिल्या गेल्या. त्यानंतर आता प्रतोद भरत गोगावले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जाणार असल्याचं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरेही ‘राज्यपाल हटाव’साठी मैदानात : भाजपमधील लोकांनाही सोबतही घेण्याची तयारी
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाणार असल्याची माहिती समोर आली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून जाण्याची इच्छा भाजपतील निकटवर्तीय नेत्यांजवळ बोलून दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT