Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी श्रीनगरमधील लाल चौकात फडकवला तिरंगा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे (Bharat Jodo Yatra Last Point). तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा 14 राज्यांतून 3970 किलोमीटरचे अंतर कापून आता जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचली आहे (Kanyakumari To Kashmir). काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी श्रीनगरला पोहोचताच ऐतिहासिक लाल चौकात (Flag Hoisting ) तिरंगा फडकावला. (Rahul Gandhi Flag Hoisting In lal Chauk)

ADVERTISEMENT

श्रीनगर शहरातील ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधी यांच्या तिरंगा फडकवण्याच्या कार्यक्रमाबाबतही पोलिस-प्रशासनाची कारवाई दिसून आली. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने लाल चौक सील करून सर्वसामान्य नागरिकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली होती. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियांका गांधी आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेही दिसले.

काँग्रेससाठी हा ऐतिहासिक क्षण! भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर सोनिया गांधी यांचं भावनिक पत्र

हे वाचलं का?

तत्पूर्वी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज सकाळी 11 वाजता पंथा येथून निघाली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा दुपारी श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली. पंथा येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वढेरा, काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे नेते आणि कार्यकर्ते होते.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी पन्नाशीतही रोज 22 किमी चालतात; या फिटनेसमागचे रहस्य काय?

ADVERTISEMENT

रविवारी भारत जोडो यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारला घेरले आणि पंतप्रधान मोदींवरही प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधींनी ट्विट केले की, आज काश्मिरी पंडित भाजप सरकारला विचारत आहेत, तुम्ही आमचा राजकीय वापर करण्याशिवाय आमच्यासाठी काय केले? पंतप्रधानांकडे उत्तर आहे का?, असा सवाल त्यांनी ट्वीटच्या माध्यमाने प्रश्न उपस्थित केला.

ADVERTISEMENT

मुरली मनोहर जोशींनी फडकवला होता तिरंगा

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी २६ जानेवारी १९९२ रोजी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावला होता. तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि मुरली मनोहर जोशी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी एकता पदयात्रा काढली. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून हा प्रवास संपणार होता. तेव्हा नरेंद्र मोदी भाजपचे सरचिटणीस होते. २६ जानेवारी १९९२ रोजी मुरली मनोहर जोशी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत लाल चौकात ध्वजारोहण केले होते.

त्यानंतर मुरली मनोहर जोशी यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी काँग्रेस राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेशी खेळले जात असल्याचा थेट आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. पण सत्य हेही आहे की, संपूर्ण देशाचा प्रवास करून राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. त्यांना जी सुरक्षा काश्मीरमध्ये मिळाली आहे, ती देशातील अन्य कोणत्याही राज्यात दिली गेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT