महाशिवरात्रीसाठी सोयाबीनचं पिक केलं नष्ट; हायकोर्टाकडून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची खरडपट्टी

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाशिवरात्रीच्या सणासाठी चक्क शेतातील सोयाबीनच्या पिकावर जेसीबी फिरवण्यात आल्याच्या घटनेनंतर मुंबई हायकोर्टाने कोल्हापूर प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं आहे. जस्टीस एस.जे.काठावाला आणि एम.एन. जाधव यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जिल्हाधीकाऱ्यांना याचिकाकर्त्या महिलेच्या जमिनीचा कोणताही भाग शिवरात्रीच्या सणासाठी वापरण्यास मनाई केली आहे.

ADVERTISEMENT

कोल्हापूरमधील शेतकरी शशिकला अंबाडे यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कारवाईबद्दल हायकोर्टात धाव घेतली होती. शशिकला यांनी हायकोर्टाला जिल्हाप्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने सोयाबीनचं शेत नष्ट केल्याचे पुरावे सादर केले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि कुरुंदवाड नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी या सुनावणीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच सोडला साप, कोणी केलं भयंकर कृत्य?

हे वाचलं का?

सुनावणीदरम्यान अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं. याचिकाकर्त्या महिलेच्या परिवारातील सदस्यांनी ही जमिन वापरण्यासाठी परवानगी दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. १५ दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी ही जमीन वापरण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी हायकोर्टाला सांगितलं. यावेळी खंडपीठाने जिल्हाधिकारी आणि कुरुंदवाड नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना, याचिकाकर्त्या महिलेच्या परिवारासोबत झालेल्या बैठकीचा वृत्तांत आणि परवानगी म्हणून त्यांची सही असलेलं पत्र मागितलं. परंतू दोन्ही अधिकारी अशा प्रकारचं पत्र दाखवण्यात अपयशी ठरले.

नवाब मलिक कोठडीमध्ये, आजच शिक्षा सुनावल्यानं काय साध्य होणार आहे?; हायकोर्टाचा सवाल

ADVERTISEMENT

“आम्हाला हे समजत नाहीये की कायद्यामधल्या कोणत्या अधिकाराअंतर्गत हा प्रकार करण्यात आला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे याचिकाकर्त्या महिलेच्या जमिनीवर जर सोयाबीनचं पिक घेतलं जात असेल तर ती जमीन १५ दिवसांसाठी शिवरात्रीचा सण साजरा करायला कशी घेतली जाऊ शकते? जरीही याआधी कोल्हापुरात अशी पद्धत सुरु असेल तरीही यावर विसंबून राहता येणार नाही. याचिकाकर्त्यांनी यासाठी आक्षेप घेतला असेल तर कोर्टाला हे थांबवावच लागेल.”

ADVERTISEMENT

यावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याचिकाकर्त्या महिलेची जमीन शिवरात्रीच्या सणासाठी वापरली जाणार नाही आणि हा उत्सव दुसऱ्या जागेवर साजरा केला जाईल अशी हमी दिली. ज्यानंतर हायकोर्टाने ही सुनावणी १० मार्चपर्यंत तहकुब केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT