पुणे : ‘बिग बास्केट’च्या गोदामात अग्नितांडव; लाखोंचा माल भस्मसात, तिजोरीत होते 6 लाख

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे शहराच्या जवळच असलेल्या बावधन बुद्रूक येथील बिग बास्केटच्या गोदामात आगीचा भडका उडाला. या अग्नितांडवात लाखो रुपयांचा भाजीपाला, धान्य, किराणा सामान आदी भस्मसात झालं असून, लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, गोदामाच्या तिजोरीत 6 लाख रुपये होते, ते बाहेर काढण्यात यश आलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

ADVERTISEMENT

बावधन बुद्रुक येथे असलेल्या बिग बास्केटच्या गोदामात मोठी दुर्घटना घडली. रविवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास गोदामात अचानक आगीचा भडका उडाला. अचानक आगीनं रौद्रवतार घेतला. गोदामातील धान्य, भाजीपाला, किराणा सामना सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं सर्व माल जळून खाक झाला.

बिग बास्केटचे व्यवस्थापक निखिल भोसले यांनी ‘आजतक’शी बोलताना सांगितलं की, ‘पुणे शहरातील बिग बास्केट शॉप्सला या गोदामातूनच मालाचा पुरवठा केला जातो. गोदामाचे तब्बल २५,००० चौरस फूट इतकं आहे.’

हे वाचलं का?

‘रविवारी रात्री या गोदामात जवळपास ९० लाखांचा सामान या गोदामात होतं. या आगीत फर्निचर आणि फ्रीज (गोदामातील मोठे फ्रीज) सर्व काही जळून खाक झालं आहे’, अशी माहिती निखिल भोसले यांनी दिली.

ADVERTISEMENT

‘गोदामाला लागलेल्या आगीत तिजोरीही जळायला लागली होती. मात्र, प्रसगांवधान राखून अग्निशमन दलाच्या जवानांनी तिजोरी सुरक्षितपणे आगीतून बाहेर काढली. या तिजोरीत ६ लाख रुपये रोख रक्कम मिळाली आहे. मात्र, या तिजोरीत ८ लाख रुपये होते, असं बिग बास्केटच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

सध्या पुणे महापालिकेचं अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि एमआयडीसी अशा सर्व अग्शिशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर ६० जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT