Pearl Puri: बलात्कार प्रकरणात अडकलेला अभिनेता पर्ल पुरीला मोठा दिलासा, जामीन मंजूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी (Rape Case) अटकेत असलेल्या टीव्ही अभिनेता पर्ल पुरीला (Perl Puri) अखेर वसई सत्र कोर्टाने जामीन (Bail) मंजूर केला आहे. पर्ल पुरी याला 4 जून 2021 रोजी पोलिसांनी अटक केली होती. पर्लचे वकील जितेश अग्रवाल यांनी अभिनेत्याच्या जामीन मिळाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पर्लला जामीन मिळताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर WE SUPPORT PEARL ट्रेंड करणं सुरु केलं आहे.

ADVERTISEMENT

कोर्टाकडून पर्लला जामीन मंजूर

बलात्कार प्रकरणी अटक केल्यानंतर पर्ल पुरी याला 5 जून रोजी वसई कोर्टात हजर करण्यात आले होते. जिथे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. कोर्टाने पर्ल पुरी याला या प्रकरणी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. यानंतर 11 जून रोजी पर्लची जामीन याचिका पुन्हा कोर्टाने फेटाळली. आता अखेर कोर्टाने अभिनेत्याला जामीन मंजूर केला आहे.

हे वाचलं का?

Rape Case : अभिनेता पर्ल पुरीला जामीन नाही, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पर्ल हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. पर्लवर जेव्हा बलात्कारासारखा गंभीर आरोप झाला तेव्हा त्याचे चाहते आणि जवळच्या मित्रांना प्रचंड धक्का बसला.

ADVERTISEMENT

तथापि, पर्लवरील हे आरोप त्याचे चाहते आणि जवळचे लोक खरे मानत नाहीए. सोशल मीडियावर चाहत्यांसह काही सेलिब्रिटींनी पर्लसाठी कॅम्पेन देखील केलं होतं. यावेळी त्यांनी पर्लला न्याय मिळावा अशी मागणी केली होती.

ADVERTISEMENT

पर्लच्या पाठिशी उभे राहिले अनेक सेलिब्रिटी

पर्ल पुरीवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर देखील अनेक सेलिब्रिटी त्याच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. अनिता हसनंदानी, सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना, एकता कपूर, दिव्या खोसला कुमार, अली गोनी, निया शर्मा अशा अनेक सेलिब्रिटींनी पर्ल निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

प्रत्येकाचे म्हणणे आहे की, पर्लला पीडित मुलीच्या वडिलांना जाणूनबुजून अडकवले आहे. पर्ल पुरी याने बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याची प्रतिमा चॉकलेट बॉयची आहे. एकता कपूरच्या शो ‘नागीन 3’ मधून पर्लला लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तो बेपनाह प्यार, ब्रह्मराक्षस यासारख्या मालिकांमध्ये देखील दिसला होता.

Mumbai Rape Case: इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, एकाच रात्री 3 ठिकाणी अल्पवयीन मुलीवर गँगरेप

नेमकं प्रकरण काय

अभिनेता पर्ल पुरीवर एका अल्पवयीन मुलीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन पीडितेवर असा आरोप केला आहे की, पर्ल पुरीने आधी कारमध्ये बलात्कार केला त्यानंतर अनेकदा बलात्कार केला. यामुळे पर्ल पुरीला बलात्कार आणि POCSO कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती.

पर्ल पुरी हा त्याच्या रिलेशन्समुळे कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करीश्मा तन्नासोबत त्याचं नातं असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. दोघांमध्ये काही काळ अफेअर सुरू होतं त्यानंतर दोघांचं ब्रेक अप झालं अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोघांमध्ये आता चांगली मैत्री आहे असंही म्हटलं जातं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT