लाट आली म्हणून गाडी वळवली अन्…; एक ठार, अक्सा बीचवर अंगावर शहारे आणणारी घटना
अक्सा बीचवर मित्राचा वाढदिवस साजरा करणं सात तरूणांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सात तरूण नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांची कार समुद्र किनाऱ्यावर घेऊन आले. लाटांच्या तडाख्यात अपघात झाला. या घटनेत सात पैकी सहा जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. […]
ADVERTISEMENT
अक्सा बीचवर मित्राचा वाढदिवस साजरा करणं सात तरूणांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सात तरूण नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांची कार समुद्र किनाऱ्यावर घेऊन आले. लाटांच्या तडाख्यात अपघात झाला. या घटनेत सात पैकी सहा जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
राहुल पवार असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. राहुल पवार हा त्याचा मित्र अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी संध्याकाळी बोलेरो गाडीने अक्सा बीचवर गेला होता. सात मित्र अक्सा समुद्र किनाऱ्यावर ही गाडी घेऊन पोहचले. मात्र ही गाडी त्यांनी पार्किंगमध्ये उभी केली नाही, तर ती गाडी ते किनाऱ्यावर घेऊन गेले.
भरधाव वेगात गाडी होती, त्याचवेळी किनाऱ्यावर लाट आली. या लाटेच्या तडाख्यात अडकू नये म्हणून त्यांनी टर्न मारला. त्यावेळी राहुल गाडीच्या बाहेर पडला. या घटनेत राहुल गंभीर जखमी झाला होता.
हे वाचलं का?
राहुलला रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अक्सा बीचवर उपस्थित असलेल्या जीव रक्षकांनी काच फोडून बाकीच्या मित्रांना काच फोडून बाहेर काढलं. या प्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारस घाटकोपरला राहणारे हे सगळे जण मित्राच्या वाढदिवसासाठी तिथे पोहचले होते. आता या ठिकाणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसंच पुढील तपासही त्यांच्याकडून करण्यात येतो आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT