चंद्रकांत पाटलांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक; शाईफेकीनंतर कार्यकर्त्यांनी केलं शुद्धीकरण
सांगली : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात महापुरुषांचा अपमान केल्याचं म्हणतं आंदोलन केली जात आहेत. यातूनच शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेचा भाजपकडून निषेध केला जात आहे. रविवारी सांगलीमध्येही चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा भाजपा सांगली शहर आणि जिल्हाच्यावतीने निषेध करण्यात आला. मात्र निषेधासोबतच […]
ADVERTISEMENT
सांगली : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात महापुरुषांचा अपमान केल्याचं म्हणतं आंदोलन केली जात आहेत. यातूनच शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेचा भाजपकडून निषेध केला जात आहे.
ADVERTISEMENT
रविवारी सांगलीमध्येही चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा भाजपा सांगली शहर आणि जिल्हाच्यावतीने निषेध करण्यात आला. मात्र निषेधासोबतच यावेळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक केला. तसंच हाताला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आणि अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांना जशात तसं उत्तर देऊ असा इशाराही दिला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पैठणमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचं असेल तर सरकार नक्की मदत करतील. मी आणि संदीपान भुमरे अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर पैशांची कमतरता येणार नाही.
हे वाचलं का?
पण माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मला शाळा चालवतोय, पैसे द्या. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.
पुढे ते म्हणाले, आता त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, हेही त्यांनी नमूद केलं.
ADVERTISEMENT
याच वक्तव्याचा निषेध म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी दुपारी पिंपरी-चिंचवडमध्ये एका अज्ञाताने शाईफेक केली. हा समता परिषदेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत सहभागी एकूण ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याविरोधात चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT