BMC Election : भाजपचा फॉर्म्यूला ठरला, टार्गेट निश्चित! कार्यकारिणीत काय घडलं?
BMC Election 2023 News : मुंबई : महापालिका निवडणूक (BMC Election) अद्याप कधी होणार हे गुलदस्त्यात असतानाही भाजपने (BJP) तयारी सुरु केली आहे. भाजपने मुंबईसह (Mumbai) राज्यभरात प्रचाराचे नियोजन केलं असून टार्गेट फिक्स केलं आहे. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. याच बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं झाली. (BJP […]
ADVERTISEMENT

BMC Election 2023 News :
मुंबई : महापालिका निवडणूक (BMC Election) अद्याप कधी होणार हे गुलदस्त्यात असतानाही भाजपने (BJP) तयारी सुरु केली आहे. भाजपने मुंबईसह (Mumbai) राज्यभरात प्रचाराचे नियोजन केलं असून टार्गेट फिक्स केलं आहे. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. याच बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं झाली. (BJP has planned the campaign across the state including Mumbai)
भाजपचा फॉर्म्यूला ठरला :
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी २००० घरी प्रवास करणे अपेक्षित आहे. यात ५०० घरी धन्यवाद मोदी, ५०० घरांमध्ये फ्रेंडस ऑफ बीजेपी, ५०० युवा वॉरियर्स अशा स्वरुपात कामाला लागायचे आहे. येणारा काळ हा आपला आहे. वातावरण उत्तम, सक्षम नेतृत्व, निर्णय घेणारे केंद्रात आणि राज्यात सरकार यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
Shinde-BJP मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला ठिणगी? श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ पुन्हा टार्गेटवर!









