विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंना आनंदाश्रू अनावर, फडणवीसांच्या गळ्यात पडत व्यक्त केल्या भावना
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर विधान परिषद निवडणुकीत नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. 362 मतं मिळाली. डॉ. रविंद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुखांना 186 अशी मतं मिळाली. 554 जणांनी मतं दिली होती. निवडणुकीसाठीचा कोटा 275 मतांचा होता. हा कोटा चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत पूर्ण केला. या विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. 362 मतं मिळाली. डॉ. रविंद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुखांना 186 अशी मतं मिळाली. 554 जणांनी मतं दिली होती. निवडणुकीसाठीचा कोटा 275 मतांचा होता. हा कोटा चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत पूर्ण केला. या विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे जेव्हा लोकांसमोर आले तेव्हा बावनकुळे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात पडत आपल्या भावनांना वाट करून दिली.
बावनकुळेंचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी; फडणवीसांचा महाविकास आघाडीला दिला इशारा
हे वाचलं का?
विधान परिषद निवडणुकीच्या दोन जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, “आज मला अतिशय आनंद होत आहे. माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. खरं म्हणजे मी स्वतः जेव्हा निवडून आलो, तेव्हा मला तितका आनंद झाला होता, त्यापेक्षाही जास्त आनंद मला आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे”, असं फडणवीस म्हणाले.
“भाजप नागपूरमध्ये मजबूत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे. विदर्भातील दोन्ही जागा आम्ही जिंकलो आहोत. आगामी महापालिका निवडणुकांमध्येही भाजप राज्यात नंबर एकचा पक्ष ठरेल”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
या विजयानंतर भाजपचे विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ‘काँग्रेसला जी 186 मतं मिळाली आहेत. जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली नसती, तर 186 मतेही मिळाली नसती. राष्ट्रवादी-शिवसेना पाठिशी उभी राहिल्याने मतं मिळाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन मंत्र्यांच्या दबावाखाली आहे. यामुळे कांग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. छोटू भोयर यांनीही स्वतःला मतदान केलं. त्यांनीही काँग्रेसला मतदान केलं नाही. हा नाना पटोलेंचा पराभव असून, त्यांनी प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला पाहिजे’, असं बावनकुळे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT