वळसे-पाटलांसारखे अनुभवी, मुरब्बी व्यक्तीदेखील आज सारखे अडखळत होते, कारण…: फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजप आमदार गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी खुद्द सरकारी वकिलांच्या कार्यालयात कुभांड रचलं जात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केला होता. याच सगळ्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (14 मार्च) विधानसभेत सरकारच्या वतीने उत्तर दिलं. पण त्यांच्या या उत्तरानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील यांच्यावरच टीकेची झोड उठवली.

ADVERTISEMENT

‘आज खरं म्हणजे उत्तर देताना वळसे-पाटील यांच्यासारखे अनुभवी आणि मुरब्बी व्यक्ती देखील सारखा अडखळत होता याचं कारण त्यांना मनातून हे माहिती होतं की, आपण जे उत्तर देतोय ते चुकीचं देतोय.’ असं म्हणत फडणवीस यांनी वळसे-पाटलांवर पलटवार केला.

पाहा मीडियाशी बोलताना फडणवीस नेमकं काय म्हणाले?

हे वाचलं का?

‘वळसे-पाटील आज सारखे अडखळत होते’

‘राज्याचे पोलीस याची चौकशी कशी करणार? त्यांच्यावर दबाव येणारच म्हणून आम्ही मागणी केली होती की, हे प्रकरण सीबीआयला द्यायला पाहिजे. आज खरं म्हणजे उत्तर देताना वळसे-पाटील यांच्यासारखे अनुभवी आणि मुरब्बी व्यक्ती देखील सारखा अडखळत होता याचं कारण त्यांना मनातून हे माहिती होतं की, आपण जे उत्तर देतोय ते चुकीचं देतोय.’

ADVERTISEMENT

‘जोपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडे जात नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे. आम्ही न्यायालयात देखील जाणार आहोत. एकदा याची चौकशी सीबीआयला गेली तर फार मोठ्या षडयंत्रांचा पर्दाफाश या ठिकाणी होणार आहे.’ असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

‘आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे’

‘मी न्यायालयासंदर्भात बोललो नाही. पण कदाचित काही बालबुद्धीचे लोकं तिथे होते. की ज्यांनी असं समजलं की, हे न्यायालयाबद्दल बोलत आहेत. अर्थात आता ते माझे सहकारी असल्याने मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. पण न्यायालयाच्या संदर्भात अशाप्रकारे बाकं वाजवणं हा न्यायालयाचा अपमान आहे. म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं की, न्यायालयाने एखादा निर्णय आमच्या बाजूने दिला काय किंवा एखादा निर्णय आमच्या विरोधात दिला काय आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.’ असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

‘मी FBI काढली आहे… फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’

‘गृहमंत्र्यांना सांगा की मी एक FBI काढला आहे. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. अरे विरोधी पक्ष नेत्याचं कामच आहे. विरोधी पक्ष नेत्याकडे सोशीत, पीडित असे सगळे लोकं पुरावे आणून देत असतात.’

‘कारण त्यांना अपेक्षा असते की, सरकारकडून जिथे अन्याय होतोय तिथे विरोधी पक्षनेता आपल्याला न्याय मिळवून देईल. म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्याकडे येत असतात. अजून येणार आहेत.. येतीलच. लोकं आणूनच देतात. मला मांडावेच लागेल.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

‘सरकार उघडं पडतंय म्हणून काही लोकांना बराच त्रास होतोय’

‘असं आहे की, आठ-आठ तास बँकेत बसून ज्या प्रकारची माहिती तयार केली जात आहे त्यातून हे स्पष्ट आहे की, प्रविण दरेकरांना टार्गेट करण्याचं काम सरकार करत आहे. ओढून-ताणून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचं काम सुरु आहे. हे आम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे. त्यांनी केस केली तर आम्ही न्यायालयात जाऊ.’

‘मला असं वाटतं की, माझ्यावर हक्कभंग आणला तर त्याला मी उत्तर देईन. मी जे केलं आहे आणि मला जेवढा कायदा कळतो. त्यानुसार कोणत्याही हक्कभंगाच्या कार्यकक्षेत ते बसत नाही. मात्र, मला असं वाटतं की, ज्या प्रकारचे हल्ले सरकारवर होत आहेत आणि ज्या प्रकारे सरकार उघडं पडतंय त्यातून काही लोकांना बराच त्रास होताना दिसत आहे.’ या शब्दात हल्लाबोल करण्यात आला.

फडणवीसांच्या ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ची सरकारकडून दखल, तपास CID कडे सोपवला

पेन ड्राईव्ह प्रकरणात आम्ही कोर्टात जाऊ!

‘मी जो पेन ड्राईव्ह दिला होता त्या पेन ड्राईव्हच्या संदर्भात आता राज्य सरकारची भूमिका तर स्पष्ट झाली की ते सीबीआयकडे जाणार नाहीत. त्यामुळे येत्या आठवडाभरात माननीय न्यायालयाकडे जाऊ. मी पुन्हा सांगतो आमच्याकडे त्याच्या व्यतिरिक्त इतरही पुरावे आहेत. ते योग्य वेळी न्यायालयात किंवा सीबीआयकडे देऊ.’

‘मी जो पेन ड्राईव्ह दिला होता त्यात घटना दिसत आहे. सरकार कशा प्रकारे सरकार स्वत:च षडयंत्र रचत आहे याचा पर्दाफाश मी केलेला आहे. यानंतर सरकार म्हणतं की, याची चौकशी आम्ही पोलिसांमार्फत करु. सरकारविरोधात आम्ही तक्रार दिली. त्यात सरकारचे मंत्री, त्यांचे प्रमुख यांची नावं आली आहेत. अशावेळी राज्यातील पोलीस कसे चौकशी करु शकतात? दबावाखील ते अशाप्रकारची चौकशी करु शकतात? आमचं म्हणणं आहे की, ते तपास करुच शकत नाहीत. यासाठी आमची मागणी आहे की, सीबीआयकडे सोपावं.’ असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, आगामी काळात या सगळ्या विषयावरुन आता पुढील काळात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT