भाजप खासदार राम स्वरुप शर्मांची दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार राम स्वरुप शर्मा यांनी दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. दिल्लीतील RML हॉस्पिटलजवळील गोमती अपार्टमेंटमध्ये शर्मा यांनी गळफास घेतला. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि ३ मुलं असा परिवार आहे. शर्मा यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

शर्मा यांच्या अकस्मित निधनानंतर भाजप नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शर्मा यांच्या निधनाचं वृत्त समजताच भाजपने आजची आपली पार्लमेंट बोर्डाची बैठक रद्द केली.

१९५८ साली जालपेहर गावात शर्मा यांचा जन्म झाला. २०१४ साली शर्मा मंडी लोकसभा मतदार संघातून निवडून आले…यानंतर २०१९ साली झालेल्या निवडणुकीतही राम स्वरुप शर्मा या मतदार संघात विजयी झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या स्टँडीग कमिटीवर राम स्वरुप शर्मा सदस्य म्हणून काम पाहत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT