बूंद से गई? ठाण्यात बिल न देता रेल्वे मंत्र्यांचा नाश्ता,नंतर भाजप कार्यकर्त्यांची सारवासारव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– विक्रांत चव्हाण, ठाणे प्रतिनिधी

ADVERTISEMENT

वडापाव हे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो. राज्यातील कोणत्याही शहरात तुम्हाला वडापावचे स्टॉल जागोजागी दिसतात. गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून ते गर्भश्रीमंत व्यक्तींमध्येही या वडापावची क्रेझ आहे. परंतू हाच वडापाव भारताचे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलाच महागात पडला आहे.

ठाणे येथील प्रसिद्ध गजानन वडापावमध्ये दौऱ्यातील कार्यक्रम संपल्यानंतर भाजप नेत्यांनी नाश्ता करुन बिल न देताच काढता पाय घेतला. ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी तात्काळ गजानन वडापाव दुकानात जाऊन दोन हजार रुपये देत संपूर्ण बील चुकतं केलं. परंतू पहिल्यांदा बील न भरता मंत्रीमहोदयांनी घेतलेला काढता पाय चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

हे वाचलं का?

जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

१८ फेब्रुवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं उद्घाटन ठाण्यात रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. हा सोहळा पार पडल्यानंतर राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री आश्विनी वैष्णव, ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांच्यासोबत असलेल्या लवाजम्याने ठाण्याती प्रसिद्ध गजानन वडापाव येथे जाऊन नाश्ता केला.

ADVERTISEMENT

यावेळी मंत्रीमहोदयांसह सर्वांनीच वडापाव, भजी या पदार्थांवर ताव मारला. परंतू बील देण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनीच तिकडून काढता पाय घेतला.

ADVERTISEMENT

या घटनेची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना जाग आली. यानंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी गजानन वडापावमध्ये जाऊन दोन हजार रुपये देत सर्व बील चुकतं केलं. परंतू दिवसभर सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये या घटनेची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर या घटनेचं वर्णन अनेकांनी बूंद से गई वो हौद से नही आती, असं काहीसं केलं आहे.

दरम्यान बिलाचे पैसे चुकते केल्यानंतर स्थानिक भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं आहे. घडलेला प्रकार हा गैरसमजुतीमधून घडल्याचं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. बिलाचे पैसे चुकते गेल्यानंतर गजानन वडापावचे मालक यांनीही या प्रकरणावर पडदा टाकत, मला बिलाचे पैसे मिळाले असून मंत्री महोदयांचे पाय माझ्या दुकानाला लागले याबद्दल मी आभारी आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT