आदित्य ठाकरेंना उपनगरात शोधून दाखवा आणि मोफत लस मिळवा – भातखळकरांची टीका
तौक्ते चक्रीवादळाचा राज्यात कोकण किनारपट्टीसह मुंबईलाही बसला. मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमार बांधवांनाही या वादळाचा फटका बसला…ज्यात त्यांच्या बोटीचं नुकसान झालं. परंतू मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी या भागांत फिरकलेच नसल्यामुळे भाजपने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना उपनगरात शोधून दाखवा आणि मोफत लस मिळवा अशी योजना भाजप सुरु करणार असल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर […]
ADVERTISEMENT
तौक्ते चक्रीवादळाचा राज्यात कोकण किनारपट्टीसह मुंबईलाही बसला. मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमार बांधवांनाही या वादळाचा फटका बसला…ज्यात त्यांच्या बोटीचं नुकसान झालं. परंतू मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी या भागांत फिरकलेच नसल्यामुळे भाजपने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना उपनगरात शोधून दाखवा आणि मोफत लस मिळवा अशी योजना भाजप सुरु करणार असल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
हरवलेले पालकमंत्री @AUThackeray कुणाला दिसले का तौक्ते वादळानंतर ? सापडले तर सांगा आम्हालाही… pic.twitter.com/Ep7vbmVtMP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021
“मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंना शोधून दाखवा आणि १८-४४ वयोगटासाठी मोफत लस मिळवा अशी योजनाच भाजपच्या वतीने मी सुरु करणार आहे.” पालकमंत्रीपदावर नेमणूक होऊन दीड वर्ष झालं. या काळात केवळ एकदा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकप्रतिनीधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचं भातखळकरांनी म्हटलंय.
मागच्या वर्षी निसर्ग वादळ आलं यंदा तौक्ते वादळ आलं…वर्सोवा, मढ, मालवणी, गोराई या परिसरातल मच्छिमारांचं मोठं नुकसान झालंय. झाडाच्या फांद्या कोसळून गाड्यांचं नुकसान झालं, एका व्यक्तीने जीव गमावला. चाळीत, इमारतींमध्ये पाणी शिरलं, सोसायट्यांची कंपाऊंड पडली. परंतू पालकमंत्री या काळात फक्त ऑनलाईन दिसले. नुकसान झालेल्या लोकांना अजुनही आर्थिक मदत मिळालेली नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून पालकमंत्री घरात लपून बसले आहेत असं म्हणत भातखळकरांनी आदित्य ठाकरेंना आपल्या टीकेचं लक्ष्य केलंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT