तळकोकणात राणे-शिंदे गटाचं सुत जुळलं? नितेश राणे-उदय सामंत एकाच बॅनरवर
सिंधुदुर्ग : अखेरीस तळकोकणात राणे आणि शिंदे गट यांच्यातील सुत जुळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचे कारण नवरात्री निमित्त कणकवलीतील एका बॅनरवर भाजप आमदार नितेश राणे, शिंदे गटाचे आमदार उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे फोटो एकत्रित पहायला मिळत आहेत. या फोटोंमुळे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असतानाच नवीन राजकीय समीकरणे […]
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग : अखेरीस तळकोकणात राणे आणि शिंदे गट यांच्यातील सुत जुळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचे कारण नवरात्री निमित्त कणकवलीतील एका बॅनरवर भाजप आमदार नितेश राणे, शिंदे गटाचे आमदार उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे फोटो एकत्रित पहायला मिळत आहेत. या फोटोंमुळे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असतानाच नवीन राजकीय समीकरणे जुळू लागल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
कोकणात राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटातही हा वाद कायम होता. शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि राणे बंधुमध्ये बंडानंतर काही दिवसांतच शाब्दिक वाद रंगला होता. महाराष्ट्रभर हा वाद गाजला होता. मात्र आता सामंत यांच्या रुपाने शिंदे गट आणि राणे बंधुंमध्ये सुत जुळलं असल्याची चर्चा आहे.
उदय सामंत रत्नागिरीमधून निवडून येतात. परंतु ठाकरे सरकारमध्ये ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री असल्याने त्यांचाही सिंधुदुर्गच्या राजकारणावर प्रभाव आहे. अशातच कणकवली शहरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त राज्याचे उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांच्या समृद्धी फाउंडेशनचे लॉन्चिंग कणकवली पटकीदेवी मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान झाले.
हे वाचलं का?
यावेळी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत, त्याचे बंधू किरण सामंत आणि भाजप आमदार नितेश राणे, भाजपाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा एकत्रित फोटो बॅनरवर पाहायला मिळत आहे.
समृद्धी फाउंडेशनच्या निमित्ताने कणकवली शहराच्या ‘समृद्धी’ चा हा नवीन ‘पॅटर्न’ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जनतेसमोर आला आहे. सोबतच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बॅनरवर एकत्रित लागलेले फोटो हे देखील भविष्यातील राजकीय समीकरणांची झलक दाखवून देणारे ठरणार का असा सवाल विचारला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT