आज काळीज फाटलं! मुलाच्या अपघाती निधनानंतर आमदार विजय रहांगदळेंची डोळ्यात अश्रू आणणारी पोस्ट
मंगळवारची सकाळ उजाडली ती वर्धा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताच्या बातमीने. या अपघातात मेडिकलला शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये भाजप आमदार विजय रहांगदळे यांच्या मुलाचा म्हणजेच अविष्कार रहांगदळेचाही समावेश होता. मुलाच्या मृत्यूनंतर आमदार विजय रहांगदळे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट भावूक करणारी आहे. काय आहे विजय रहांगदळे यांची फेसबुक पोस्ट? आज काळीज फाटलं, त्यानं आकाश […]
ADVERTISEMENT
मंगळवारची सकाळ उजाडली ती वर्धा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताच्या बातमीने. या अपघातात मेडिकलला शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये भाजप आमदार विजय रहांगदळे यांच्या मुलाचा म्हणजेच अविष्कार रहांगदळेचाही समावेश होता. मुलाच्या मृत्यूनंतर आमदार विजय रहांगदळे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट भावूक करणारी आहे.
ADVERTISEMENT
काय आहे विजय रहांगदळे यांची फेसबुक पोस्ट?
आज काळीज फाटलं,
हे वाचलं का?
त्यानं आकाश गाठलं
अविष्कार आमचा हिरा
ADVERTISEMENT
होता आनंदाचा झरा
ADVERTISEMENT
डॉक्टर नव्हते खमारी गावा
होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात
बापाचे स्वप्न पूर्ण करण्या
गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या..
लागली कुणाची नजर
आज दगडालाही फुटला पाझर
गेला तरूण वयात सोडून
केलेले सर्व वादे तोडून
तुझी आई आजही वाट पाही
तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई
कसे समजवू तिला,
तू परत येणार नाहीस मुला
कुठे हरवलास पाखरा
परत ये रे आमच्या लेकरा
गेलास अविष्कार आम्हाला सोडून
तुझ्यासाठी रंगवलेले सारे स्वप्न मोडून
आज आहे मातम सगलीकडे
आई-बाबा संगे सारा गावही रडे…
अशी पोस्ट फेसबुकवर लिहून आमदार विजय रहांगदळे यांनी त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे.
मंगळवारी कार पुलावरून खाली कोसळून वर्ध्यात भीषण अपघात झाला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. देवळी या ठिकाणाहून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. हे सगळे मित्र वाढदिवसाची पार्टी करायला गेले होते. त्यानंतर परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
भाजप आमदार विजय रहांगदळे यांचा मुलगा अविष्कार याचाही या अपघातात मृत्यू झाला. अविष्कार वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होता. रात्री परत येत असताना या सगळ्यांची कार नदीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की सगळे विद्यार्थी या अपघातात ठार झाले. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुमारे चार ते पाच तास सुरू होतं.
पवन शक्ती या विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मेडिकलचे हे सात विद्यार्थी महिंद्रा एसयूव्हीने निघाले. वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर हे सगळे परतत होते आणि त्याचवेळी ही कार चाळीस फूट खोल नदीत पडली. या कारमधले सातही जण जागीच ठार झाले. नदीत कोसळलेली ही कार आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार-ते पाच तास लागले.
नीरज चौहान, अविष्कार रहांगदळे, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती अशी अपघातात मृत्यू झालेल्या सात जणांची नावं आहे. हे पार्टी करण्यासाठी गेले होते. परत येत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आता त्यानंतर आमदार विजय रहांगदळे यांनी मुलासाठी लिहिलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT