एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना भाजपपेक्षा दहा पट जास्त ताकद देऊ : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. भाजपची त्यांच्या पक्षासोबत युती असून आम्ही शिंदे यांच्या पाठीशी अगदी ताकदीने उभे आहोत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही शेलक्या शब्दात टीका केली.

ADVERTISEMENT

नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टीका केली होती. बाळासाहेबांची ढाल करणे आणि मागून भाजपची तलवार चालवणे हेच शिंदे गटाचे चिन्ह, असे पटोले म्हणाले होते. यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे यांनी पटोलेंना टोला लगावला.

बावनकुळे म्हणाले, आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षासोबत युती आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी जेवढी ताकद लागेल त्यापेक्षा १० पट जास्त ताकद आम्ही त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला देणार आहे.

हे वाचलं का?

नाना पटोले यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही आता मशालीची, पंजाची आणि घडाळ्याची चिंता करावी. कमळ आणि ढाल–तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाही आणि हे तुम्ही माझ्याकडून लिहुन घ्या, असेही बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे गोंदिया दौऱ्यावर :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संघटनात्मक कामासाठी आज गोंदिया दौऱ्यावर आले होते. यावेळी बाईक रॅलीने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर जलाराम लॉन येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. तसेच भाजप सोशल मीडिया टीमसोबतही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बूथ कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT