शिवसेनेने तमाशे बंद करावेत नाहीतर BJP राज्यभर तांडव करेल – आशिष शेलार
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेल्या अटकेवरुन राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे. जन आशिर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर आज नाशिकमध्ये नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर संगमेश्वरमध्ये असताना रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतलं. भाजपने राज्य सरकारच्या या कारवाईवर टीका केली असून भाजपचे निलंबीत आमदार आशिष शेलार यांनी सरकारला गंभीर […]
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेल्या अटकेवरुन राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे. जन आशिर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर आज नाशिकमध्ये नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर संगमेश्वरमध्ये असताना रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतलं. भाजपने राज्य सरकारच्या या कारवाईवर टीका केली असून भाजपचे निलंबीत आमदार आशिष शेलार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेने आपले तमाशे थांबवावेत नाहीतर भाजप राज्यात तांडव करेल असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. ते इंदापुरात पत्रकारांशी बोलत होते. “केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेल्या अटकेचा मी निषेध करतो. यावरुन सरकारला आणि शिवसेनेला आम्ही एकच गर्भित इशारा देतो की सुरुवात तुम्ही केली आहेत शेवट आम्ही करु. ज्या प्रमाणे राज्य सरकार वागत आहे ते पाहून अफगाणिस्तानातले तालिबानीही शरमेने आत्महत्या करतील, राज्यात सध्या इतकी झुंडशाही सुरु आहे.”
Narayan Rane vs Shivsena वाद पेटला, जाणून घ्या राज्यभरात आज काय-काय घडलं?
हे वाचलं का?
दरम्यान, नारायण राणे यांच्या जिवाला धोका आहे, पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. भाजपचे कार्यकर्ते यांच्यात आणि पोलिसांमध्ये झटापट झाली नाही. आम्ही इतकंच सांगत होतो की तुम्हाला अटक करायचं असेल तर करा पण त्यांचं जेवण होऊ द्या कारण त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचा त्रास आहे. डॉक्टरही चेक अप साठी बोलावले आहेत. मात्र चेक अपही होऊ दिलं नाही. बी.पी. देखील पाहू दिलं नाही. त्यामुळे ही हुकुमशाही आहे का? पोलिसांनी अद्याप नारायण राणेंना अटक दाखवलेली नाही. सहा वाजण्याच्या आधी अटक करून कोर्टापुढे हजर केलं पाहिजे पण तसं करत नसल्याने माझा हा आरोप आहे की राणे यांच्या जिवाला धोका आहे. असं प्रसाद लाड यांनी पत्रकारांना सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT