आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपची आता कोल्हापूरवर स्वारी, पोटनिवडणुकीत देणार काँग्रेसला आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवलेल्या भाजपने आता आपलं पुढचं लक्ष्य कोल्हापूरकडे वळवलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचं कळतंय. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली आहे. मध्यंतरी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतू चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्यातील इतर भाजप नेत्यांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनल्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार असं दिसतंय.

ADVERTISEMENT

काँग्रेसने या पोटनिवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे भाजपने सत्यजित कदम यांच्या रुपाने तगडा उमेदवार उभा करत आपलं आव्हान तयार केलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष शिवसेनेनेही उडी मारायची ठरवल्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणुक चुरशीची होणार असं दिसतंय.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतू मागच्या निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत चंद्रकांत जाधव यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेने या पोटनिवडणूकीत आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी केल्याचं कळतंय. तसेच यासाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नावाचा आग्रह सर्वानुमते धरण्यात आलायं. यासंबंधी गेले दोन दिवस मुंबईत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठका सुरू आहेत. कालच्या बैठकीत शिवसेनेनं दिलेला मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पालकमंत्री सतेज पाटील यांनी फेटाळून लावलाय. त्यामुळं शिवसेनेने ही निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवलाय.

हे वाचलं का?

गेल्या दोन दिवसातील बैठकीचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. ज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारपर्यंत आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी दिली.

याचसोबत चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवलेल्या भाजपनेही कोल्हापूरची निवडणुक लढवण्याचं ठरवलंय. आतापर्यंत भाजपने ६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून यात माजी नगरसेवक सत्यजीत कदम, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची नावं पाठवण्यात आल्याचं कळतंय. परंतू या नावांमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष लढलेल्या सत्यजित कदमांचं नाव भाजपकडून शर्यतीत आघाडीवर असल्याचं कळतंय. मध्यंतरी सतेज पाटलांनी हि निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले खरे परंतू शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष निवडणुक लढण्यावर ठाम राहिल्यामुळे कोल्हापूरची लढाई नेमका कोणता पक्ष जिंकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT