Ashish Shelar : “मुंबई महापालिकेतली लढत भाजप विरूद्ध आप , उद्धव ठाकरेंची शिवसेना…”
गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. २००२ मध्ये भाजपने १२५ पेक्षा जास्त जागा मिळवल्या होत्या. तो रेकॉर्डही आता यावेळी भाजपने मोडला आहे. भाजपवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अशात आशिष शेलार यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. काय म्हटलं आहे आशिष शेलार? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध आप असा होणार. राष्ट्रवादी खिजगणतीत नाही, काँग्रेस डाउन साईज […]
ADVERTISEMENT
गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. २००२ मध्ये भाजपने १२५ पेक्षा जास्त जागा मिळवल्या होत्या. तो रेकॉर्डही आता यावेळी भाजपने मोडला आहे. भाजपवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अशात आशिष शेलार यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे आशिष शेलार?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध आप असा होणार. राष्ट्रवादी खिजगणतीत नाही, काँग्रेस डाउन साईज झालाय, उद्धव यांची शिवसेना दुर्बल झालीय…त्यामुळे आमचं लक्ष फक्त आपच्या हालचालींवर आहे
गुजरात आणि आमचा मुंबई महापालिकेचा आकडा 150 चा आहे… त्यामुळे इतरांनी आता रतन खात्रीचे आकडे लावू नयेत.
हे वाचलं का?
गुजरात निवडणुकीबाबत काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी?
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी संघटनेचं जाळं विणलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता किती वाढली आहे हे प्रत्येक निकालागणिक दिसतं आहे. अमित शाह यांनीही जी रणनीती वापरली त्या सगळ्याचं यश आणि आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत हे सगळं गुजरातच्या निवडणूक निकालात पाहण्यास मिळालं असं म्हणत आशिष शेलार यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रश्नावर काय म्हटलंय आशिष शेलार यांनी?
प्रत्येक निवडणूक वेगळी असते. मुंबई महापालिकेची निवडणूकही वेगळी असणार आहे. लसावी आणि मसावी काढायचा झाला तर एवढं नक्की करता येतं की राष्ट्रवादी खिजगणतीत नाही. काँग्रेस डाऊन टू साईझ झाली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत आप विरूद्ध भाजप असाही सामना होऊ शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT