PM Modi: ‘शॉर्टकट राजकारण म्हणजे विकृती’, मोदी कोणत्या पक्षाला म्हणाले विकृत राजकारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PM Modi fired arrows of criticism at AAP: नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज (11 डिसेंबर) नागपूर-शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केलं. यासोबतच त्यांनी नागपूरमधील अनेकविध प्रकल्पाचे उद्घाटन केलं. तसेच काही प्रकल्पांची पायभरणी देखील केली. याच वेळी केलेल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी आम आदम पक्षाला नाव न घेता टार्गेट केलं. (bjp vs aap shortcut politics means perversity modi fired arrows of criticism at aap)

ADVERTISEMENT

भारतात शॉर्टकट राजकारणाची विकृती पसरत चालली आहे. करदात्यांचे पैसे लुटण्याचं काम हे नेते आणि पक्ष करत आहेत. त्यामुळे कमाई आठ आणे आणि खर्च रुपया हे धोरण देशाचं अर्थकारण रसातळाला घेऊन जाईल. अशी टीका पंतप्रधान मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचं नाव न घेता केली.

PM Modi Marathi Speech: ‘आज संकष्टीचा दिवस…’, पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण

हे वाचलं का?

पाहा पंतप्रधान मोदींनी नागपुरातून विरोधकांवर कसा निशाणा साधला.

‘शॉर्टकट राजकारण म्हणजे विकृती…’

ADVERTISEMENT

‘भारताच्या राजकारणात येणाऱ्या विकृतीपासून सावधान करु इच्छितो. ही विकृती आहे ती शॉर्टकटच्या राजकारणाची. ही विकृती आहे राजकीय स्वार्थासाठी देशाच्या पैसा लुटण्याची. ही विकृती आहे. करदात्यांनी कमावलेले पैसे लुटण्याची. शॉर्टकट घेणारे हे राजकीय पक्ष, राजकीय नेते देशाचे प्रत्येक करदात्याचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. ज्यांचा हेतू फक्त सत्तेत येण्याचं असतं. ज्यांचं लक्ष्य खोटी आश्वासनं देऊन फक्त सरकार हडपण्याचं असतं. ते कधीही देश बनवू शकत नाहीत.’

ADVERTISEMENT

‘आज भारत पुढील 25 वर्षांच्या विचार करुन काम करत असताना काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेत.’ असा गंभीर आरोपच पंतप्रधान मोदींनी यावेळी केला आहे.

‘एकेकाळी द. कोरिया हा देखील गरीब देश होता. पण…’

‘मी पुन्हा म्हणतोय… शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, स्थायी समाधानासाठी काम करणं यासाठी दीर्घ व्हिजन असणंही गरजेचं आहे. स्थायी विकासाचं मूळ असतं ते पायाभूत सुविधा.’

‘एकेकाळी द. कोरिया हा देखील गरीब देश होता. पण पायाभूत सुविधेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशाचं भाग्य बदललं. आज आखाती देश एवढे पुढे आहेत कारण त्यांनी मागील काही दशकात आपल्या पायाभूत सुविधा मजबूत आणि आधुनिक केलं आहे.’ असं उदाहरणही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिलं आहे.

PM Modi : ‘त्या कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न करेन’; पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण

‘काही पक्ष देशाला आतून पोखरत आहेत…’

‘जर या देशांमध्येही शॉर्टकटचं राजकारण झालं असतं, करदात्यांचे पैसे लुटले असते तर हे देश त्या उंचीवर कधीच पोहचू शकले नसते. जिथे ते आज आहेत. उशिरा का होईना भारताकडे आता ही संधी आली आहे.’

‘स्वार्थी राजकीय पक्ष आणि नेत्यांना आपण जनतेनं उघडं पाडलं पाहिजे. कमाई आठ आणे खर्च रुपया… ही निती घेऊन जे राजकारण करत आहेत ते या देशाला आतून पोखरत आहेत. जगातील अनेक देशात अशा धोरणामुळे त्यांची अर्थव्यवस्था बुडीत गेल्याचं पाहिलं आहे. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे.. देशात एकीकडे फक्त स्वार्थ आणि दुसरीकडे देशहित आणि समर्पण भाव आहे.’ असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जहरी टीका केली.

‘..म्हणून आम्हाला गुजरातमध्ये एवढं यश मिळालं!’

‘आता मागील जे आठवड्यात गुजरातमध्ये जे निवडणुकीचे निकाल आपल्याला पाहायला मिळाले ते स्थायी विकास आणि स्थायी समाधानाची आर्थिक निती, विकासाच्या रणनितीचा परिणाम आहे. मी शॉर्टकट घेणाऱ्या राजकीय नेत्यांना नम्रपणे सांगतो की, स्थायी विकासाचं व्हिजन समजून घ्या. त्याचं महत्त्व समजून घ्या. आज देशाला त्याची किती गरज आहे ते समजून घ्या. जर आपण देशहिताला प्राधान्य दिलं तर तुम्ही देखील शॉर्टकट राजकारणाचा देखील जरुर सोडून द्याल.’ असा सल्लाच मोदींनी आपल्या विरोधकांना यावेळी दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT