पायघड्या घातल्या तरीही युती होणार नाही, BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं विधान
भाजप आणि शिवसेना यांच्यात आगामी काळासाठी युती होणार की नाही या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. आता कोणी पायघड्या जरी घातल्या तरीही युती होणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप स्वतःच्या ताकदीवर लढवेल असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ते बुलढाण्यातील शेगावमध्ये बोलत होते. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची […]
ADVERTISEMENT
भाजप आणि शिवसेना यांच्यात आगामी काळासाठी युती होणार की नाही या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. आता कोणी पायघड्या जरी घातल्या तरीही युती होणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप स्वतःच्या ताकदीवर लढवेल असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ते बुलढाण्यातील शेगावमध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झालेली भेट, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या बंद दाराआड झालेली चर्चा यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात बरेच तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये कोणचाच संभ्रम नसून त्यांना आपल्याला एकटं लढायचं आहे हे माहिती असल्याचं पाटील म्हणाले.
“प्रत्यक्ष मैदानात येऊन काम करणारा भाजपचा कार्यकर्ता मुळीच संभ्रमात नाही. त्याला माहिती आहे की आपल्याला निवडणुक एकट्याने लढायची आहे. समोर कोणीही येऊ दे भाजप त्याला घाबरणार नाही. मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला फसवलं गेलं. कार्यकर्ता आणि सर्वसामान्य माणसांमध्ये याविषयी नाराजी आहे. आता कोणी पायघड्या जरी घातल्या तरीही युती होणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुका मग त्या पंचायच समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा असो…भाजप एकट्यानेच लढेल आणि जिंकेल”, असा विश्वास पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT