ज्येष्ठ नागरिकांनो, लसीकरणासाठी गर्दी करु नका ! वाचा कोणी केलंय हे आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना नवीन वर्षात देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राला लसींचा कमी पुरवठा होत असल्याची तक्रार राज्य सरकार वारंवार करत आहे. मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रांवर साठा संपल्यामुळे नागरिकांना घरी परतावं लागत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी न करण्याचं आव्हान प्रशासनाने केलं आहे.

ADVERTISEMENT

तसदीबद्दल क्षमस्व ! लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईत बिकट परिस्थिती

मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईकरांना हे आवाहन केलं आहे. सध्या शहरात लसींचा पुरवठा कमी होत असून प्रत्येक केंद्रावर अद्याप लस पोहचलेली नाहीये. पण ही परिस्थिती लवकरच सुधरेल आणि ४५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस मिळेल याची खात्री बाळगावी, असं आवाहन आश्विनी भिडे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

१ मे पासून देशभरात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. मात्र महाराष्ट्रात लसींचा तुटवडा लक्षात घेता, १८ ते ४४ वयोगटासाठीचं लसीकरण १ मे पासून सुरु होणार नसल्याचं याआधीच राज्य सरकारने जाहीर केलंय. दरम्यान आश्विनी भिडे यांनीही याबद्दल माहिती देताना, १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात येईल. आताच्या लसीकरण केंद्रावर ताण येणार नाही याची काळजी महापालिका प्रशासन घेईल असं भिडे यांनी स्पष्ट केलंय.

एक मुंबईकर जो Home Isolation मधल्या 200 कोरोना रूग्णांना रोज पुरवतो दोनवेळचं जेवण

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT