भांडूपमधील महापालिका रुग्णालयात चार बालकांचा मृत्यू, BMC कडून चौकशी समितीची स्थापना

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईच्या भांडूप भागातील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात NICU मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्फेक्शनमुळे या चारही बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना दिली होती. परंतू यात रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप बालकांच्या नातेवाईकांनी केल्यामुळे, महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

ADVERTISEMENT

या घटनेचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाल्यानंतर मुंबई महापालिकेने तात्काळ चौकशी समितीची स्थापना केली आहे. या प्रकरणाचे पडसाद आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले, ज्याला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाच्या मेडीकल ऑफिसरला निलंबीत करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयाच्या NICU विभागाचे प्रमुख या प्रकरणाची चौकशी करुन सात दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करतील. विरोधी पक्षातील भाजपने या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडून हे मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे. बालकांच्या नातेवाईंनी आज रुग्णालयाच्या आवारात बसून निदर्शनंही केली.

हे वाचलं का?

भाजप खासदार मनोज कोटक यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. या घटनेविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचंही कोटक यांनी सांगितलं. स्थानिक भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनीही या घटनेनंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

याचसोबत सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा कारभार सांभाळणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडून सर्व सूत्र काढून घेण्यात यावी आणि त्याचं मेडीकल लायसन्सही रद्द करावं अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत चार बालकांपैकी तीन बालकांचा मृत्यू हा इन्फेक्शनमुळे त्यांनी उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे झाला असू शकतो. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरुन मुंबई महापालिकेला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

भांडूप येथील रुग्णालयात चार बालकांचा झालेला मृत्यू मुंबई महापालिकेची असंवेदनशीलता दाखवून देतो. बालकांना रुग्णालयातील एसी बंद असल्यामुळे त्यांची तब्येत खालावली, याला हलगर्जीपणाच म्हणतात. एकीकडे बालकांचा जीव जात असताना पेंग्विनचं नाव ठेवण्याचे सोहळे होत आहेत. इथे माणसाच्या जिवाला किंमत नाहीये अशा शब्दांत फडणवीसांनी महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

ADVERTISEMENT

आम्ही चारही बालकांचे काही नमुने घेऊन सायन रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहेत. इन्फेक्शन झालं होतं की नाही हे यातून तपासलं जाईल. या चारही बालकांच्या मृत्यूमागे एक कारण आहे असं सांगता येणार नाही. परंतू प्राथमिक तपासानंतर यात रुग्णालयाच्या प्रशासनाची कोणताही हलगर्जीपणा दिसत नाहीये.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबरला सावित्रीबाई रुग्णालयात सात बालकं अॅडमिट झाली होती. ही सातही बालकं विविध मॅटर्निटी होममध्ये जन्माला आली होती. परंतू जन्मानंतर त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना सावित्रीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू झाला असून एक बालक अजुनही व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या बालकांच्या मृत्यूची कारणं तपासणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT