पालिका आता वीज निर्मिती करणार
मुंबई तक: महानगरपालिकेने उर्जा निर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. मध्य वैतरणा तलावातून 100 मेगावॅट इतकी उर्जा निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. ज्यामुळे पालिका 20 मेगावॅट जलविद्युत तर 80 मेगावॅट तरंगती सौर उर्जा निर्मिती करणार आहे. या मंजूरीनंतर मुंबई महानगपालिका ही संकरीत पद्धतीने उर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली […]
ADVERTISEMENT
मुंबई तक: महानगरपालिकेने उर्जा निर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. मध्य वैतरणा तलावातून 100 मेगावॅट इतकी उर्जा निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. ज्यामुळे पालिका 20 मेगावॅट जलविद्युत तर 80 मेगावॅट तरंगती सौर उर्जा निर्मिती करणार आहे. या मंजूरीनंतर मुंबई महानगपालिका ही संकरीत पद्धतीने उर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगपालिका ठरणार आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याची 102.4 मीटर उंच आणि 565 मीटर लांबी असलेल्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणावर हा उर्जानिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. धरण बांधतानाच या धरणावर जलविद्यूत निर्मितीसाठी बहिर्गामी जलवाहिनी टाकण्यात आली होती.
हे वाचलं का?
मुंबई शहराची विजेची वाढती मागणी लक्षात घेता बांध, वित्तपुरवठा, वापरा आणि हस्तांतरीत कराय तत्त्वावर जलविद्युत निर्मितीबरोबर सौरउर्जा निर्मिती फायदेशीर ठरेल असा सल्ला सल्लागारांनी दिला होता. 12 डिसेंबर 2019 ला महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने जलविद्युत निर्मितीला परवानगी दिली होती. या सल्ल्यानुसार मुंबई महानगरपालिकेने कॅप्टीव्ह पॉवर प्रोड्यूसर मॉडेलनुसार या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या होत्या.
या प्रस्तावाला स्थायी समितीत सोमवारी परवानगी दिली आहे. पुढील दोन वर्षात या प्रकल्पाची उभारणी पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही महावितरण कंपनीच्या ग्रीडमध्ये पुरवली जाणार आहे. त्याबदल्यात महानगरपालिकेच्या अखत्यारितील पिसे-पांजरापूर संकुलातील वीज देयकामध्ये त्याची रक्कम अडजस्ट केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती होणार असून महानगरपालिकेच्या वीज खर्चात प्रतिवर्षी सुमारे २४ कोटी १८ लाख रुपयांची बचत होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT