आगामी गणेशोत्सवही नियमांच्या बंधनातच ! BMC कडून घरगुती आणि सार्वजनिक उत्सवासाठी नियमावली जाहीर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना देशभरासह राज्यात तिसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. अशा परिस्थिती आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकारने नियमावली व निर्बंध जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आगामी दहीहंडी सणाला परवानगी नाकारण्यात आलेली असून गणेशोत्सवावरही बंधन घालण्यात आली आहेत. २०२० मध्ये कोरोनामुळे गणेशोत्व सरकारी नियम आणि बंधनांमध्येच […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना देशभरासह राज्यात तिसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. अशा परिस्थिती आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकारने नियमावली व निर्बंध जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आगामी दहीहंडी सणाला परवानगी नाकारण्यात आलेली असून गणेशोत्सवावरही बंधन घालण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
२०२० मध्ये कोरोनामुळे गणेशोत्व सरकारी नियम आणि बंधनांमध्येच साजरा करावा लागला होता. आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गतवर्षीची नियमावली यंदाही कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवासाठी भाविकांना दर्शनाची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे.
Dahihandi ला मान्यता द्यायची नव्हती मग बैठक कशाला घेतली, हे हिंदूद्वेष्ट सरकार – बाळा नांदगावकर संतापले
हे वाचलं का?
अशी आहे गणेशोत्सवासाठी सरकारी नियमावली –
१) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीसाठी उंचीची मर्यादा ४ फूट
ADVERTISEMENT
२) घरगुती गणेशमूर्तीची मर्यादा २ फूट
ADVERTISEMENT
३) गर्दी होणार नाही याची काळजी स्थानिक गणेशोत्सव मंडळांनी घ्यायची आहे.
४) शहरातील ८४ नैसर्गिक ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. तिकडे महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल, त्यानंतर महापालिका गणेश मूर्तीचं विसर्जन करेल.
५) मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी
६) सार्वजनिक मंडळाच्या विसर्जनाला १० कार्यकर्त्यांना परवानगी
७) लहान मुलं आणि ज्येष्ठांनी विसर्जनासाठी जाऊ नये.
दरम्यान दहीहंडीच्या सणासाठी आज टास्क फोर्स, दहीहंडी पथकाचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोविंदा पथकांना संयमाचा सल्ला दिला आहे. “आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहिजेत; पण, आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचार करण्यालाच प्राधान्य द्यावं लागेल. दुसऱ्या लाटेतून आपण डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलो आहोत. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको; जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल.”
मोठी बातमी! यंदाही दहीहंडी नाहीच; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT