तीन-तीन वेळा इशारा देऊनही…माहुल-विक्रोळी Landslide प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकरांचं महत्वाचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शनिवारी मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईत दोन ठिकाणी भूस्खलनाचे प्रकार समोर आले आहेत. चेंबूर-माहुल परिसरात घराची भिंत खचून १७ जणांचा मृत्यू झाला असून विक्रोळी येथेही अशाच प्रकारची घटना समोर आली असून ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेनंतर महत्वाची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

घडलेली घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रीया पेडणेकर यांनी मराठी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली. “आम्ही महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा इशारा देऊनही लोकं बाहेर पडायला मागत नाहीत. अशावेळी पालिकेकडून कारवाई झाली की त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती मी घेतली. अधिकाऱ्यांनी तिकडच्या लोकांना ३-३ वेळा जाऊन तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत असा इशारा दिला होता. परंतू तरीही तिकडच्या लोकांनी घरं रिकामी केली नाहीत.”

Landslide in Mumbai : मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल, मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

हे वाचलं का?

“पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तुम्ही पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला”, असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं होतं अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. घडलेली घटना क्लेशदायक आहे, पण नागरिकांना हेच आवाहन आहे की लोकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केलं आहे.

Mahul Landslide : भिंत खचली, चूल विझली! जेव्हा पाऊस काळ बनून येतो..

ADVERTISEMENT

“ज्यावेळी महापालिका नोटीस देते, त्यावरून राजकीय आखाडे तयार होतात. त्यामुळे लोक ज्यावेळी राजकीय नेत्यांकडे जातात. त्यावेळी इतर राजकीय नेत्यांनीही नागरिकांना समजून सांगितलं पाहिजे. प्रशासन सांगतंय तर त्यांचं ऐका असं लोकप्रतिनिधींनी संबंधित लोकांना सांगितलं पाहिजे”, असं आवाहन पेडणेकर यांनी सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींना केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Rain : माहुल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर, घराची भिंत कोसळून झाला अपघात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT