मुंबई महापालिकेकडून कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथीलता, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या याचा सामना करत असलेल्या मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाली आहे. १५ जानेवारीपासून शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख हा उतरतीला लागला असून शहरात रुग्णांसाठी असणारे बेड्सही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल्यानंतर महापालिकेनेही आपल्या निर्बंधांमध्ये आता शिथीलता आणली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेने यासंबंधात नवीन नियम जाहीर केले असून रात्रीची संचारबंदी, हॉटेल मालकांसाठीची वेळ हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. याचसोबत शहरातील स्विमींग पूलही आता खुले केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेचे नवीन नियम –

हे वाचलं का?

१) कोरोना महामारीच्या आधीच्या नियमाप्रमाणे बीच, बागा, पार्क हे सुरु राहतील.

२) थिम आणि अम्युजमेंट पार्क हे ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

ADVERTISEMENT

३) स्विमींग पूल, वॉटर पार्क हे ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

ADVERTISEMENT

४) रेस्टॉरंट, नाट्यगृह, थिएटर हे देखील ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

५) भजनसंध्या आणि इतर सांस्कृतिक कार्याक्रमांसाठी ५० माणसांच्या उपस्थितीची अट घालून देण्यात आली आहे.

६) खुल्या जागेवरील लग्न समारंभांमध्ये २५० तर बंदीस्त जागेवर २०० माणसांची उपस्थिती चालू शकणार आहे.

७) रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ५ वाजेपर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी उठवण्यात आलेली आहे.

८) स्पर्धात्मक क्रीडा स्पर्धांमध्ये २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती चालू शकणार आहे. ही २५ टक्के उपस्थिती ही खूर्च्यांवर बसून असेल, प्रेक्षकांना उभं राहून किंवा घोळका करुन सामने पाहता येणार नाहीत.

९) स्थानिक टूरिस्ट स्पॉट नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरु राहतील.

१०) आठवडी बाजारही आपल्या नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरु राहतील.

मुंबई महापालिकेने निर्बंधांमध्ये शिथीलता आणली असली तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना कोविडच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. कोविडच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेने दिला आहे.

राज्यात ६ कोटींहून अधिक जनतेला लसीचे दोन डोस, चार जिल्ह्यांमध्ये प्रमाण ५० टक्क्यांखाली

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT