Tauktae Cyclone : मुंबईकरांनो घराबाहेर पडणं टाळा, महापालिकेकडून यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
सध्या महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, गोवा आणि कर्नाटक या राज्यांवर तौकताई वादळाचं संकट घोंगावत आहे. मुंबईतही या वादळाचे परिणाम जाणवणार असून मुंबई महापालिकेने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आश्विनी भिडे व अन्य अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत चक्रीवादळामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य खडतर परिस्थितीचा सामना कसा करायचा […]
ADVERTISEMENT
सध्या महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, गोवा आणि कर्नाटक या राज्यांवर तौकताई वादळाचं संकट घोंगावत आहे. मुंबईतही या वादळाचे परिणाम जाणवणार असून मुंबई महापालिकेने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आश्विनी भिडे व अन्य अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत चक्रीवादळामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य खडतर परिस्थितीचा सामना कसा करायचा याबाबत चर्चा करुन संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई नजिकच्या किनारपट्टीवरुन हे वादळ जाणार असल्यामुळे वेधशाळेने मुंबईत पाऊस आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत वाऱ्याचा वेग वाढून ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, तर १६ तारखेला हा वेग साधारण ६० ते ८० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊन महापालिकेने काही उपाययोजना आखल्या आहेत.
तौकताई Cyclone : कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा, मच्छिमारांना सतर्कतेचे आदेश
हे वाचलं का?
१) हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज पाहता नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन पालिकेने केलं आहे.
२) मुंबईतील चौपाट्या आणि समुद्रकिनाऱ्या लगतच्या भागामध्ये नागरिकांनी जाऊ नये यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
३) भारतीय हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता, वरळी-वांद्रे प्रकल्पाला जोडणाऱ्या सागरी सेतूवरील वाहतूक सुरु ठेवायची की नाही हा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.
ADVERTISEMENT
४) मुंबई परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
५) याव्यतिरीक्त मुंबईत जे होर्डिंग्ज धोकादायक परिस्थितीत आहेत ते ताबडतोक हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून दोन्ही उपनगरीय लोकल सेवा सुरु राहणार आहेत.
६) मुंबई मेट्रो, रस्ते विभाग, MMRDA अशा विभागांकडून सुरु असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांच्या कामात आवश्यक खबरदारीचे उपाय आणि बॅरिकेटींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
७) मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनाही या काळात सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो वेळेत पूर्ववत सुरु होईल याची काळजी घेण्यात आली आहे.
८) याचसोबत मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर राहत असलेल्या लोकांना आवश्यकतेनुसार अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT